Cloudy Weather  Agrowon
हवामान

Weather Forecast : ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार शक्य

Cloudy Weather : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात शुक्रवारी (ता. १०) सकाळी पर्यंतच्या २४ तासांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

अमोल कुटे

Pune News : कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात शुक्रवारी (ता. १०) सकाळी पर्यंतच्या २४ तासांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ११) राज्यात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेल्यानंतर या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. १५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

ढगाळ आकाशामुळे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू असून, उकाडा कायम आहे. गुरुवारी (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी (ता. १०) सकाळपासूनच ढगाळ हवामान होते.

सिंधुदुर्गात विजांसह पावसाची शक्यता

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे उच्चांकी ३५.६ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात कमाल तापमान ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे. किमान तापमानात वाढ झाली असून, पारा पुन्हा १७ अंशांच्या पुढे गेला आहे.

शुक्रवारी (ता. १०) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ११) सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३२.१ (२०.७), जळगाव ३४.३ (१७.३), कोल्हापूर २९.६ (२२.५), महाबळेश्वर २५.१ (१८.४), नाशिक ३१.६ (१८.९), निफाड ३२.४ (१७.४), सांगली २९.१ (२२.०), सातारा ३१.३ (२१.५), सोलापूर - (१८.५), सांताक्रूझ ३५.६ (२५.०), डहाणू ३४.० (२४.४), रत्नागिरी ३४.० (२५.२),

छत्रपती संभाजीनगर ३२.८ (१८.०), नांदेड ३३.२ (२२.०), परभणी ३३.० (२१.०), अकोला ३५.० (२०.०), अमरावती ३३.६ (१८.७), बुलडाणा ३२.८ (१९.०), ब्रह्मपुरी ३५.०(१८.०), चंद्रपूर ३२.०(१७.२), गडचिरोली ३३.२ (१६.८), गोंदिया ३३.२ (१६.८), नागपूर ३२.७ (१६.६), वर्धा ३३.१(१७.८), वाशीम ३४.२(१८.२) यवतमाळ ३४.५ (१६.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT