Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकरी धास्तावले

Unseasonal Rain : पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने याचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने याचा शेतातील विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. तसेच अवकाळी पाऊस झाल्यानेही नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत.

यंदा खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिके हाताची गेल्याने शेतकरी अडचणीत आहे. आता रब्बी हंगामात शेतकरी कर्ज काढून रब्बीचे नियोजन करू लागला आहे. तर अनेक ठिकाणी खरिपाच्या पिकांची काढणी सुरू आहे.

Crop Damage
Rain Update : सातारा जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान तयार होत असून, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने खरीप पिकांचे व रब्बीच्या पेरणीवर, फळबागांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांना वाटत आहे.

सध्या पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामात सरासरीच्या २ लाख २९ हजार ७१२ हेक्टरपैकी ६३ हजार ३७७ हेक्टर म्हणजेच २८ टक्के पेरणी झाली आहे. सध्या पिके रब्बी हंगामातील ज्वारी पिके उगवून वर आली आहे. मका, हरभरा, गहू पिकांच्या पेरणीस सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून थंडी असल्याने पिकांची उगवण चांगली आहे.

Crop Damage
Unseasonal Rai Latur : लातूरला अवकाळी पावसाने झोडपले

परंतु दोन दिवसांपासून अनेक भागांत कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान पडत असल्याने त्याचा गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.

फवारणीच्या खर्चात वाढ होत आहे. त्यातच ढगाळ हवामानाचा देखील पिकांवर परिणाम होत आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील वातावरणात काही प्रमाणात बदल होत आहे. ऊन, ढगाळ हवामान, कमी-अधिक प्रमाणात पडत असलेल्या थंडीमुळे आंबा, द्राक्षे, डाळिंब पिकांना धोका निर्माण झाला आहे. याशिवाय हरभरा, गहू, ज्वारी पिकांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या अनेक ठिकाणी पिके उगवणीच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती काळजी घेऊन नुकसान टाळावे.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com