Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update: किमान तापमानात चढ-उतार शक्य

Weather Forecast: दोन दिवसांत राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्यात थंडी कमी होत, उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे. आज (ता. ३१) किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम राजस्थानात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच वायव्य भारतात १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत १४५ नॉट्स वेगाने पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे प्रवाह कायम आहेत. उत्तर भारतात थंडीचा कडाका सातत्याने कमी-अधिक होत असून, गुरुवारी (ता. ३०) पूर्व उत्तर प्रदेशातील फुरसतगंज येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात गारठा कमी-अधिक होत असला तरी पहाटे धुक्याची चादर कायम आहे. गुरुवारी (ता. ३०) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १३ ते २० अंशांच्या दरम्यान आहे.
दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने कमाल तापमान ३२ ते ३६ अंशांच्या दरम्यान असून, उकाड्यामुळे घामटा निघत आहे.

गुरूवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला येथे ३६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, जेऊर, सोलापूर येथे पारा ३५ अंशांपार आहे. तसेच अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांच्या वर गेला आहे.

आज (ता. ३१) महाराष्ट्राच्या पश्चिम भागात किमान तापमानात काहीशी घट होण्याची तर उर्वरित राज्यात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. रविवारपासून (ता.२) कमाल तापमानात वाढ होऊन, ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. ३०) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
ठिकाणे तापमान कमाल तापमान किमान
पुणे ३५.९ १४.९
अहिल्यानगर ३३.९ १३.४
धुळे ३२ १०
जळगाव निरंक १४.६
जेऊर ३५.५ १५.५
कोल्हापूर ३२.७ १९.१
महाबळेश्वर २९.५ १७

मालेगाव ३२.८ १५.४
नाशिक ३४.१ १३.३
निफाड ३०.५ ११
सांगली ३४ १६.९
सातारा ३४.३ १५.७
सोलापूर ३५.१ २०.१
सांताक्रूझ ३१.८ १६.९
डहाणू ३०.३ १८
रत्नागिरी ३२.२ १९.१
धाराशिव ३२.४ १५.४

छत्रपती संभाजीनगर ३४ १६.८
परभणी ३४.५ १७.८
परभणी (कृषी) ३३.७ १४
अकोला ३६.३ १८.५
अमरावती ३३.८ १९.१
भंडारा ३१.६ १८
बुलडाणा ३४.४ १८

ब्रह्मपुरी ३४.४ १७.२
चंद्रपूर ३३ निरंक
गडचिरोली ३१.४ १५.४
गोंदिया ३१.२ १९.२
नागपूर ३२.६ १७.२
वर्धा ३४.१ १८
वाशीम ३१.६ १९
यवतमाळ ३४.४ २०.६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT