Maharashtra Weather Update  Agrowon
हवामान

Maharashtra Weather Update : कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार शक्य; राज्यात उन्हाळ्याची चाहूल

Minimum Temperature : विदर्भात सकाळपर्यंतच्या २४ तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे ३६.३ अंश तापमानाची नोंद झाली.

Dhananjay Sanap

weather forecast : राज्यात पहाटेचा गारवा कमी झाला असून दुपारी उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. राज्यातील उन्हाचा चटका वाढत असून कमाल तापमान अनेक ठिकाणी ३५ च्या पार आहे. त्यामुळे उष्णतेची झळा तापदायक ठरत आहेत.

विदर्भात सकाळपर्यंतच्या २४ तासात अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३६.८ अंश तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर येथे ३६.३ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. 

राज्यातील कमाल तापमानात १ ते २ अंशाने घट होण्याची शक्यता आहे. परंतु पुढील दोन दिवसात पुन्हा कमाल तापमानात वाढ होईल. तर किमान तापमान पुढील १ ते ३ अंशाने कमी होण्याचा अंदाज आहे.

परंतु पुढील दोन दिवसांत किमान तापमान २ ते ३ अंशाने वाढ होण्याची हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात मागील २४ तासात सर्वात निचांकी नाशिक येथे १२.१ अंश सेल्सियसची नोंद झाली. 

उत्तर पाकिस्तान लगतच्या भागापासून ते जम्मू काश्मीर आणि लगतच्या भागात समुद्रसपाटी ३.१ किलोमीटर ऊंचीवर पश्चिमी चक्रावात आहे. तसेच उत्तर आसाम आणि लगतच्या भागात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर ऊंचीवर चक्राकार वारे वाहत आहे.

तर उत्तर भारतात समुद्रसपाटीपासून १२.६ किलोमीटर ऊंचीवर १३० नॉट्स वेगाने पश्चिमी वारे वाहत आहेत. देशात मागील २४ तासात राजस्थान येथील फतेहपूर येथे निचांकी ६.१ अंश तापमानाची नोंद झाली. 

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT