Weather Agrowon
हवामान

Maharashtra Winter Weather : पावसाला पोषक हवामान

Weather Forecast : उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी ओसरली आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आकाश ढगाळ झाले आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी ओसरली आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने आकाश ढगाळ झाले आहे. सोमवारी (ता. २३) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे नीचांकी ९ अंश तापमान नोंदले गेले. आज (ता. २४) राज्यात ढगाळ हवामानासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. आज (ता. २४) ही प्रणाली उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी - अधिक होत आहे. सोमवारी (ता. २३) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

थंडी ओसरल्याने धुळे वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान १० अंशांच्या वर गेले आहे. पावसाला पोषक हवामान होत असतानाच, अनेक भागात पहाटेच्या वेळी धुक्याची चादर आणि दव पडल्याचे दिसत आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत असून, सोमवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३२.१ अंश तापमानाची नोंद झाली.

राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान दिसून येत असून, आजपासून (ता. २४) पावसाला पोषक हवामान होणार आहे. विदर्भात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असून, राज्यात उकाड्यात वाढ होत तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. २३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.९ (१६.६), अहिल्यानगर ३०.० (१४.४), धुळे २८.० (९.०), जळगाव २८.६ (१६.४), जेऊर ३२.५ (१६.०), कोल्हापूर २८.६ (१८.६), महाबळेश्वर २३.६ (१३.६), मालेगाव २६.८ (१३.२), नाशिक २८.४ (१४.०), निफाड २७.० (१५.३), सांगली २९.४ (१७.२), सातारा ३०.८ (१५.०), सोलापूर ३१.८ (२०.४),

सांताक्रूझ ३०.२ (२०.४), डहाणू २७.२ (१८.९), रत्नागिरी ३०.० (२१.१), छत्रपती संभाजीनगर २८.५ (१७.४), बीड (१८.०), धाराशिव (१८.०), परभणी २९.२ (१६.८), परभणी कृषी विद्यापीठ २९.४ (१५.५), अकोला २९.५ (१७.१), अमरावती ३०.० (१६.१), भंडारा २८.६ (१४.०), बुलडाणा २९.४ (१७.२), ब्रह्मपुरी ३२.१ (१५.५), चंद्रपूर २९.८, गडचिरोली २९.४ (१४.४), गोंदिया २९.४ (१४.४), नागपूर २९.४ (१४.६), वर्धा २८.२ (१५.०), वाशीम ३१.६ (१५.८), यवतमाळ ३०.२.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT