Maharashtra Winter Weather Agrowon
हवामान

Maharashtra Cold Weather : थंडी वाढण्याची प्रतिक्षा कायम; राज्यातील बहुतांशी भागात तापमानातील चढ उतारही कायम

Maharashtra Winter Weather : उत्तर भारतातही थंडी कमी झालेली दिसते. यामुळे राज्यात किमान तापमान अधिक आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील थंडी अद्यापही कमीच आहे. सकाळच्या वेळी काही भागात धुके आणि ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. उत्तर भारतातही थंडी कमी झालेली दिसते. यामुळे राज्यात किमान तापमान अधिक आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा थंडी जाणवायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

उत्तर भारतात थंडी कमी झालेली आहे. तर अनेक भागात किमान तापमानात चढ उतार सुरु आहेत. उत्तर भारतातील थंडीची लाटही सध्या नाही. आज हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर केरळमधील कन्नूर येथे देशातील सर्वाधिक ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. 

राज्यातील काही भागात आजही अंशतः ढगाळ वातावरण होते. तर काही भागात सकाळी वातावणात धुक्याची चादर दिसून येत आहे. तसेच उत्तर भारतातून थंडी वाऱ्यांचे प्रवाह खंडीत झाले आहेत.

या कारणांनी राज्यातील थंडी कमीच आहे. राज्यात थंडी वाढण्याला काही दिवसांची वाट पाहावी लागू शकते. तर पुढील काही दिवस राज्यातील तापमानात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT