Cloudy Weather Agrowon
हवामान

Cloudy Weather : ढगाळ वातावरण, पावसामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांची तारांबळ

एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने अनेक भागांत धुमाकूळ घातला. मात्र गेल्या काही दिवसांत पावसाचा प्रभाव कमी झाला होता.

Team Agrowon

Nashik News : एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने (Stormy Rain) अनेक भागांत धुमाकूळ घातला. मात्र गेल्या काही दिवसांत पावसाचा प्रभाव कमी झाला होता. पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, वादळी वारा व पावसाच्या सरी अधूनमधून येत आहेत.

गुरुवारी (ता. २७) व शुक्रवारी (ता. २८) अनेक ठिकाणी काढलेला शेतीमाल अचानक आलेल्या पावसामुळे भिजत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडण्यासह मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागांत वादळी वाऱ्यासह हलकीशी गारपीट झाल्याने अनेक ठिकाणी उन्हाळा कांदा भिजला. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली होती.

त्यानंतर अनेक भागांत ऊन सावलीसह पावसाने कमीअधिक प्रमाणावर हलकी हजेरी लावल्याने कामे खोळंबली. उन्हाळी हंगामात ग्रामीण भागात वाळवणासारख्या घरगुती कामांनाही पावसाचा अडसर ठरत आहे. उन्हाळ्यात थोड्याफार पाण्यावर उभी केलेली चारा पिकेही वाऱ्यामुळे आडवी झाली.

शेतकऱ्यांमध्ये धास्ती

एकीकडे शेतकरी आता उन्हाळ कांदा काढणीच्या कामात व्यग्र होते. मात्र ढगाळ वातावरण व सरींमुळे शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.

अगोदरच मजूरटंचाईमुळे कामे अडचणींत सापडली आहेत. त्यातच मधूनच येणाऱ्या पावसामुळे कांदा भिजून खराब होत आहे. जिल्ह्यात सटाणा, कळवण, मालेगाव, नाशिक, येवला, निफाड तालुक्यांना पावसाचा फटका बसला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT