Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather Update : राज्यात दोन दिवसांत थंडी आणखी वाढणार ; हवामान विभागाचा अंदाज

Winter Weather News : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची अंदाज असल्याने दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढत आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची अंदाज असल्याने दोन दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच पश्चिमी चक्रवातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी सुरूच आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी झाला आहे. सोमवारी (ता. ६) राजस्थानच्या जैसेलमेरमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात आकाश निरभ्र होत, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या वर गेल्याने थंडी कमी अधिक होत आहे. कमाल तापमान ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे.

सोमवारी (ता. ६) परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राज्यातील नीचांकी ८.३ अंश तापमान नोंदले गेले. सोमवारी (ता. ६) सकाळपर्यंच्या २४ तासांत सोलापूर येथे ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आजपासून (ता. ७) राज्याच्या किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात गारठा हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सोमवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

पुणे---३१.५---१३.८

अहिल्यानगर---३१.०---१२.३

धुळे---३१.०---१०.४

जळगाव---३०.५---११.०

जेऊर---३२.५---११.०

कोल्हापूर---३०.३---१६.१

महाबळेश्वर---२७.८---१४.७

मालेगाव---२७.६---१४.४

नाशिक---३२.०---१४.७

निफाड---३०.५---१०.५

सांगली---३१.७---१३.६

सातारा---३२.२---१२.८

सोलापूर---३३.८---१७.२

सांताक्रूझ---३३.२---१६.८

डहाणू---२६.९---१७.८

रत्नागिरी---३३.०---१७.५

छत्रपती संभाजीनगर---३१.६---१५.६

धाराशिव---३०.७---११.८

परभणी---३१.५---११.५

परभणी (कृषी)---३०.७---८.३

अकोला---३३.४---१५.९

अमरावती---३१.४---११.९

भंडारा---३०.६---१३.०

बुलडाणा---३३.०---१७.५

ब्रह्मपुरी---३३.४---१२.०

चंद्रपूर---३०.२---(-)

गडचिरोली---३०.४---१२.०

गोंदिया---२९.६---११.४

नागपूर---३०.६---११.२

वर्धा---३०.०---११.९

वाशीम---३१.६---१६.२

यवतमाळ---३१.०---१५.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT