Cold Weather Agrowon
हवामान

Cold Weather : राज्यात थंडी वाढण्याची शक्यता

Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, रविवारी (ता. १३) पंजाबच्या लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे २.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

अमोल कुटे

Pune News : उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी परतली असून, उर्वरित राज्याच्या किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १५) राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, रविवारी (ता. १३) पंजाबच्या लुधियाना येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी उणे २.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेशात अति दाट धुक्याचे साम्राज्य पाहायला मिळाले. तसेच उद्यापर्यंत (ता. १६) पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली राज्यात थंडीची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात किमान तापमानात घट होऊ लागली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता उर्वरित राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान १२ ते १७ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात हळूहळू घट होत थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

रविवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

पुणे ३३.३ (१५.४), धुळे ३२.४ (११.४), जळगाव ३२.५ (१६.७), कोल्हापूर ३२.३ (१८.५), महाबळेश्‍वर २७.६ (१५.५), नाशिक ३२.३ (१५.४), निफाड ३१ (१२.२), सांगली ३२.९ (१७.२), सातारा ३२.२ (१५.८), सोलापूर ३४.१ (१८.६), सांताक्रूझ ३३.३ (२०.६), डहाणू २८.६ (१८.६), रत्नागिरी ३४.१ (२१.१),

छत्रपती संभाजीनगर ३१ (१६.४), नांदेड ३१.६ (१७.८), परभणी ३२.४ (१७), अकोला ३२.६ (१६.७), अमरावती ३०.६ (१६.४), बुलडाणा ३१ (१७), ब्रह्मपुरी ३२.८ (१७.३), चंद्रपूर ३१.६ (१६), गडचिरोली ३०.२ (१६.४), गोंदिया ३०.२ (१६), नागपूर ३१.१ (१६.२), वर्धा ३१.५ (१६.५), वाशीम ३२.२ (१४.६), यवतमाळ ३१.८ (१५.२).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT