cloudy weather Agrowon
हवामान

Cloudy Weather : मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम

Weather Update : खानदेशात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम आहे. उष्णता वाढली असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सीअसवर आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम आहे. उष्णता वाढली असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सीअसवर आहे. कुठेही जोरदार पाऊस झालेला नसल्याने शेतीकामे मात्र सुरू आहेत. परंतु ढगाळ वातावरणामुळे लहान केळी बागा, भाजीपाला पिकांत रोगराईच्या भितीने फवारण्या, खतांचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागत आहे.

कापणी, मळणीचे काम वेगात सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना पावसाचा धसका आहे. कारण पाऊस आल्यास हाती आलेला घास जाऊ शकतो. सोयाबीन, मका, ज्वारीची मळणी सुरू आहे. काही भागात ज्वारी मळणीवर आली आहे. तसेच पेरणीचे कामही सुरू आहे.

अशात हलक्या, मध्यम जमिनीत वाफसा कमी आहे. पाऊस आल्यास या क्षेत्राला लाभ होवू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उष्णतेमुळे केळी, ऊस, कापूस आदी पिकांत सिंचन करण्याची धावपळही सुरू आहे. कारण ऊन पडत असल्याने वाफसा स्थिती टिकवून ठेवणे आवश्यक आहे.

रोज सकाळपासून ढगाळ वातावरण असते. काही वेळेस ढगांची जमवाजमव वाढते व पावसाळी वातावरणही दुपारी तयार होते. सोबत उष्णता असते. यामुळे शेतात कामे उरकून घेण्याची धावपळ सुरू आहे. ऊन मध्यंतरी अधिक होते. कमाल तापमान ३८ अंश सेल्सीअस असल्याने त्या काळात ऑक्टोबर हिट जाणवली.

शेतकरी थंड वातावरणाच्या प्रतीक्षेत आहेत. खानदेशात सर्वत्र उष्णता अधिक आहे. मुरमाड, हलक्या जमिनी लागलीच तापत असल्याने त्यात सिंचन करावे लागत आहे. अशातच उष्णतेत हलक्या जमिनीत सिंचन करावे लागत आहे. केळी बागांत सिंचन, खतांचे व्यवस्थापन सुरू आहे. कारण बुरशीजन्य रोग सक्रिय होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT