Stormy Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert: वादळी पावसाची शक्यता कायम

IMD Update : पूर्वमोसमी पावसामुळे तापमानात घट झाली, तरी अनेक ठिकाणी ४० अंशांपेक्षा जास्त तापमान आहे. हवामान खात्याने विदर्भात ऑरेंज, तर इतर भागांत येलो अलर्ट दिला आहे.

अमोल कुटे

Pune News: राज्याच्या काही जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज (ता. १४) राज्यात वादळी पावसाची शक्यता कायम आहे. तर विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

‎मंगळवारी (ता.१३) उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. विदर्भापासून मराठवाडा ते उत्तर केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धुळे, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, नांदेड आणि परभणी, तसेच विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली.

मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला आणि गडचिरोली येथे राज्यातील उच्चांकी ४०.६ अंश तापमानाची नोंद झाली. जळगाव, ‎ब्रह्मपुरी, ‎चंद्रपूर, ‎यवतमाळ येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. ‎‎जेऊर, सोलापूर, ‎परभणी आणि अमरावती येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

आज (ता. १४) विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

मंगळवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :

‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान

‎पुणे---३६.४---२२.३

अहिल्यानगर---३६.०---२३.७

‎‎धुळे---३७.०---२३.०

‎जळगाव---३९.५---२५.८

‎जेऊर---३८.५---२१.५

‎कोल्हापूर---३४.६---२३.८

महाबळेश्‍वर---२७.७---१८.५

‎मालेगाव---३७.०---२३.२

‎नाशिक---३३.४---२२.२

‎निफाड---३४.२---२१.८

‎सांगली---३६.४---२४.६

‎सातारा---३४.८---२३.०

‎सोलापूर---३८.९---२५.८

सांताक्रूझ---३४.६---२६.०

डहाणू---३५.२---२५.६

‎रत्नागिरी---३४.०---२६.२

‎छत्रपती संभाजीनगर---३६.६---२५.२

‎धाराशिव---३५.८---२०.२

‎परभणी---३८.५---२५.५

परभणी (कृषी)---३६.८---२५.१

‎अकोला---४०.६---२७.५

अमरावती---३८.४---२४.३

‎‎भंडारा---३७.४---२७.०

बुलडाणा---३४.५---२३.०

‎ब्रह्मपुरी---३९.१---२७.०

चंद्रपूर---३९.६---२७.२

‎गडचिरोली---४०.६---२५.४

‎गोंदिया---३७.८---२६.०

‎नागपूर---३५.९---२६.१

‎वर्धा---३६.५---२८.५

‎वाशीम---३७.६---निरंक

‎यवतमाळ---३९.०---२५.०

वादळी पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर.

वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

३९ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

‎अकोला ४०.६, गडचिरोली ४०.६, जळगाव ३९.५, ‎ब्रह्मपुरी ३९.१, ‎चंद्रपूर ३९.६, ‎यवतमाळ ३९.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT