Rain Alert Agrowon
हवामान

Maharashtra Rain Alert : उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

Team Agrowon

Pune News : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १७) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या सरींची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दक्षिण पश्चिम बंगाल आणि परिसरावर वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. सोमवारी (ता. १६) ही प्रणाली पुरुलियाच्या आग्नेयेकडे ४० किलोमीटर, बंकुरापासून ११० किलोमीटर नैॡत्येकडे, झारखंडच्या जमशेदपूरपासून ६० किलोमीटर, तर रांची पासून १४० किलोमीटर पूर्वेकडे होती.

ही प्रणाली झारखंड, छत्तीसगडकडे येण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा अमृतसर, रोहतक, शाहजहानपूर, लखनऊ, दल्तोंगंज, वादळी प्रणालीचे केंद्र (डीप डिप्रेशन) ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय होते.

पावसाच्या उघडिपीनंतर कमाल तापमानात वाढ-घट होत आहे. सोमवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. १७) राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Account Verification: शेतकऱ्यांच्या खात्यांची कर्जमाफीसाठी तपासणी

Monsoon In Kerala: आनंदघन केरळात

Onion Procurement Rules: कांदा खरेदीचे निकष शिथिल

Vidarbha Rain Forecast: विदर्भात वादळी पावसाचा इशारा

Dahivadi Heavy Rain: दहिवडी परिसराला पावसाने झोडपले

SCROLL FOR NEXT