Agriculture Weather Agrowon
हवामान

Weekly Weather : हलक्या, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Weather : महाराष्ट्रावर पुढील आठवडाभर १००२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातही काही दिवशी मुसळधार तर काही दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव व लातूर जिल्ह्यांत काही दिवशी मुसळधार, तर उर्वरित नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे.

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम व अमरावती जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भातील नागपूर जिल्ह्यात काही दिवशी मुसळधार, तर काही दिवशी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाची शक्यता सोमवार, गुरुवार व शनिवारी (ता.१४, १८ व १९) आहे. इतर दिवशी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराची शाखा कार्यरत होऊन पावसाचा जोर अधूनमधून वाढेल. तर काही वेळा उघडीप राहण्याची शक्यता आहे.

प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान १६ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ ते २५ अंश सेल्सिअस इतके राहण्यामुळे ‘एल-निनो’चा प्रभाव सुरू होईल. त्यामुळे यापुढील काळात पावसाच्या प्रमाणात वाढ होत जाण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहण्यामुळे पावसाचे प्रमाण वाढणे शक्य आहे.

कोकण

आज आणि उद्या (ता.१४, १५) प्रतिदिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ७८ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ६५ ते ६७ मि.मि. रायगड जिल्ह्यात ५० ते ६१ मि.मी., ठाणे जिल्ह्यात २८ ते ५० मि.मी. व पालघर जिल्ह्यात ३५ ते ४२ मि.मी. इतक्या पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡतेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ७ ते ११ कि.मी. राहील.

कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, रत्नागिरी जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत समान म्हणजेच २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.१४, १५) नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत प्रतिदिन ५ ते ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर धुळे जिल्ह्यात आज (ता.१४) ५ मि.मी. तर उद्या (ता.१५) १३ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात आज (ता.१४), तर उद्या (ता.१५) १३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज १२ मि.मी व उद्या ७ मि.मी., तर जळगाव जिल्ह्यात आज १२ मि.मी. व उद्या ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे.

वाऱ्याची दिशा जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत नैॡतेकडून राहील. कमाल तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर धुळे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७० टक्के राहील.

मराठवाडा

आज आणि उद्या (ता.१४, १५) धाराशिव जिल्ह्यात ९ ते ४५ मि.मी., लातूर जिल्ह्यात ७ ते २० मि.मी., नांदेड जिल्ह्यात ११ ते १८ मि.मी., बीड जिल्ह्यात १० ते २६ मि.मी., परभणी जिल्ह्यात ८ ते १३ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १० ते १३ मि.मी., जालना जिल्ह्यात १० ते २२ मि.मी. व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ ते १० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वायव्येकडून, तर धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत नैॡतेकडून राहील.

कमाल तापमान परभणी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस तसेच बीड जिल्ह्यात ते २६ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८८ टक्के राहील.

पश्चिम विदर्भ

आज आणि उद्या (ता.१४, १५) अकोला जिल्ह्यात ५ ते ६ मि.मी., अमरावती जिल्ह्यात ६ ते ११ मि.मी., बुलडाणा जिल्ह्यात ८ ते ११ मि.मी. व वाशिम जिल्ह्यात १० ते १३ मि.मी. प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाण मध्यम राहील. वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १७ कि.मी. राहील.

कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, अकोला जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर वाशिम जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७६ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज आणि उद्या (ता.१४, १५) वर्धा जिल्ह्यात ४ ते १० मि.मी., नागपूर जिल्ह्यात ५ ते १७ मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात १० ते १२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ कि.मी. राहील.

कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, वर्धा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमन सर्वच जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७० टक्के राहील.

पूर्व विदर्भ

आज आणि उद्या (ता.१४, १५) चंद्रपूर जिल्ह्यात १५ ते १८ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २० ते ३८ मि.मी., भंडारी जिल्ह्यात १५ ते १६ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात २३ ते २७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. मात्र गडचिरोली जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡतेकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ताशी ७ ते ९ कि.मी., तर चंद्रपूर जिल्ह्यात ताशी १६ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७८ टक्के राहील.

पश्चिम महाराष्ट्र

आज आणि उद्या (ता.१४, १५) नगर जिल्ह्यात ५ ते १४ मि.मी, पुणे जिल्ह्यात १२ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ७ ते ३२ मि.मी., सातारा जिल्ह्यात ८ ते २६ मि.मी., सांगली जिल्ह्यात ३ ते २१ मि.मी, कोल्हापूर जिल्ह्यात ९ ते ४२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैऋतेकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १६ ते २० किमी राहील. कमाल तापमान पुणे व सातारा जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअसर, सोलापूर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर नगर व कोल्हापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८२ टक्के इतकी राहील.

कृषी सल्ला

पुरेशा पावसाअभावी पेरणी न झालेल्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा येताच पेरण्या पूर्ण कराव्यात.

हिरव्या चाऱ्यासाठी ल्युसर्न, बरसीम किंवा मक्याच्या आफ्रिकन टॉल यांची पेरणी करावी.

उगवण दाट झालेल्या ठिकाणी विरळणी करून घ्यावी.

भात पुनर्लागवड करावयाच्या खाचरामध्ये चिखलणी करावी.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT