Dhananjay Munde Resignation  agrowon
Video

Dhananjay Munde Resignation :धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का वाचवू शकले नाहीत?

मागील ९० दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले महायुती सरकारचे राज्य अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. या संपूर्ण घडामोडींचे विश्लेषण आणि राजकीय नाट्याचा वेध घेण्यासाठी ‘झाडाझडती विथ रमेश जाधव’ या विशेष मालिकेचा हा भाग नक्की पाहा.

Team Agrowon

महायुती सरकारचे राज्य अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे मागील ९० दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांनी अखेर मंगळवारी (ता. ४) म्हणजेच काल आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारून मुंडे यांना मुक्त केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूचाळ आला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती, पण तो स्वीकारायला तीन महिने का लागले, हा मोठा प्रश्न आहे. पीकविमा घोटाळा, अधिकाऱ्यांच्या बदल्या, ऊसतोडणी मशीन खरेदी, डीबीटीमधील गैरव्यवहार यांसारख्या विविध आरोपांमुळे मुंडे अडचणीत आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Lifestyle: आदिवासींची निसर्गपूरक शेती अन् जीवनशैली

Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना

Maharashtra’s Grape Industry: जागतिक ‘व्हिजन’ ठेवून द्राक्ष उद्योगाची वाटचाल

Weekly Weather: राज्यात चांगल्या पावसाची शक्यता

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

SCROLL FOR NEXT