Soybean Crop Agrowon
Video

Soybean Crop: पेरणीच्या वेळेस सोयाबीन पिकाला कोणती खते फायदेशीर?

Kharif Season: पीक फुलोरावस्थेत असताना किंवा दाणे भरण्याच्या वेळेस पावसाचा खंड पडल्यास पाण्याचं व्यवस्थापन करावं, म्हणजे उत्पादनात घट येणार नाही.

Team Agrowon

Soybean Sowing: सोयाबीन पेरणीच्या वेळी शिफारसीनूसार सोयाबीनला ५० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद ,४५ किलो पालाश आणि १० टन शेणखत प्रती हेक्टरी द्याव. या खत मात्रेमधील ५० टक्के नत्र आणि पालाश पेरणीच्या वेळी आणि उरलेले पेरणीनंतर ३५ दिवसांनी द्यावं.  ही शिफारस हलक्या जमिनीमध्ये सोयाबीनच जास्त उत्पादन मिळविण्यासाठी आहे. जमिनीच्या पोतानुसार ४५ बाय ५ सेंटीमीटर किंवा ३० बाय १५ सेंटीमीटर पेरणीचे अंतर ठेवावे. बियाणे ३.५ ते ४ सेंटीमीटर पेक्षा खोल पेरू नये. हेक्टरी रासायनिक खताबरोबर १० किलो बोरॅक्स आणि २० किलो झिंक सल्फेट द्याव. पीक २० ते २५ दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळ पडत पडल्यास सूक्ष्म अन्नद्रव्य ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पेरणीनंतर नत्रयुक्त खतं देण टाळावं. पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी करू नये. शेंगा लागण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४ या विद्राव्य खतांची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT