Cotton Crop Care: पिकातील जास्तीच्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करा. वापसा येताच कोळपणी आणि खुरपणी करावी. त्यानंतर लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश म्हणजे ००:००:५० हे खत + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावं. या द्रावणाची प्रत्येक झाडाला १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ हे खथ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून द्रावण तयार कराव. या द्रावणाची प्रत्येक झाडाला १०० मिली चाप्रमाणे आळवणी करावी. या द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबावी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.