gavar bhaav: गवारचे भाव मागील आठवडाभरात पुन्हा वाढले आहेत. सध्या राज्यातील बाजारांमध्ये गवारला सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. जांभळाला सध्या चांगला उठाव आहे. मुंबईसारख्या बाजारात गुणवत्तेप्रमाणे अगदी २० हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. पुणे बाजारात सरासरी ७ हजारांचा दर आहे. तर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर मार्केटला जांभूळ ३ हजार ते ४ हजार रुपयाने विकले जात आहे. बाजारातील ज्वारीची आवक टिकून आहे. त्यामुळे दरही काहीसे स्थिरावले आहे. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मुगाला बाजारात सध्या हमीभावापेक्षा खूपच कमी दर मिळत आहे. सध्या मूग प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात आहे. सोयाबीनचा हंगाम सुरु होऊन आता ९ महीने झाले. सध्या बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी आहे. सध्या सोयाबीनला बाजारात ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.