Maharashtra heatwave alert agrowon
Video

Maharashtra Weather: पुढील दोन दिवस विदर्भात तापमानाचा पारा चढणार

उन्हामुळे दुपारी घराबाहेर निघणे मुश्किल होत आहे. राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांशी भागात दुपारचे तापमान चाळीशी पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर अनेक ठिकाणी तापमान ४० अंशाच्या पुढे सरकले आहे. हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला.

Team Agrowon

राज्यात तापमान झपाट्याने वाढत असून दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अनेक भागांत तापमान ४० अंशांच्या पुढे गेलं असून, विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांतही येलो अलर्टचा इशारा आहे. दक्षिण महाराष्ट्रात काही भागांत ढगाळ वातावरण आणि किरकोळ पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, मालेगाव आणि सोलापूर जिल्ह्यांत तापमान ४० अंशांच्या पार पोहोचले आहे. हवामान विभागाने राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Baramati Agriculture Development : दुबईतील परिषदेत बारामतीतील उपक्रमाची दखल

Ind-US Trade War : डोनाल्ड ट्रम्प यांचे करयुद्ध आणि भारत

Heavy Rainfall: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा; नांदेडमध्ये पूरस्थिती, मुंबईसह अनेक जिल्ह्यांत संततधार

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

SCROLL FOR NEXT