mango farming tips agrowon
Video

Mango Orchid: आंबा लागवडीचं योग्य अंतर किती असावं?

Mango Plantation: आंबा झाड बहूवर्षीय व उंच वाढणारे असून, त्याची मुळे अन्नद्रव्याच्या शोधात‌ खूप खोलपर्यंत जातात. त्यामुळे आंबा लागवडीसाठी गाळाची, कसदार आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ८ दरम्यान, मुक्त चुन्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असलेली जमीन निवडावी.

Team Agrowon

Mango Farming Tips: उथळ, नापीक, डोंगर उतारावरील व काही प्रमाणात पाणथळ, क्षारयुक्त जमिनीमध्ये लागवड करायची असल्यास अधिक काळजी घ्यावी. अशा जमिनीमध्ये पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे, जमीन समपातळीत करणे, गरजेप्रमाणे गाळ टाकणे किंवा मुरूम टाकणे या सारख्या सुधारणा शास्त्रीय पद्धतीने करून घ्याव्या लागतात. त्यानंतर एक मीटर लांब, रुंद व खोल खड्डे खोदावेत. त्यात गाळाची माती ५० ते ६० टक्के आणि शेणखत भरून घ्यावे. जमिनीचा सामू जास्त असल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य प्रमाणात मुरूम टाकून व अन्य काही तांत्रिक सुधारणा केल्यानंतर आंबा बाग लावता येऊ शकते.


लागवडीचे अंतराचे विविध प्रयोग:
आंबा लागवडीसाठी पूर्वीपासून दहा बाय दहा मीटर अंतर शिफारशीत आहे. मात्र ९० च्या दशकात आम्ही औरंगाबादमध्ये व गटशेतीमध्ये पाच बाय पाच मीटर व पाच बाय सहा मीटर अंतरावर म्हणजे घन पद्धतीने आंबा लागवडीचे प्रयोग केले होते. मात्र २००५ मध्ये आंबा परिषदेच्या निमित्ताने दिलेल्या दक्षिण आफ्रिका भेटीमध्ये एक बाय चार मीटर, दीड बाय पाच मीटर अशा अंतरावर पाच हजार हेक्टर क्षेत्रावर केलेली अतिघन आंबा लागवड पाहण्याचा योग आला. एकरी २० ते २२ टन उत्पादन येत असल्याचे समजले. त्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या शेतावर दीड बाय चार मीटर, पाच फूट बाय तेरा फूट किंवा पाच फूट बाय १४ फूट अशा अंतरावर आंबा लागवडीस सुरुवात केली. २००६ मध्ये रुईभर (जि. धाराशिव) येथे, तर २००७ मध्ये ढाकेफळ (ता. पैठण) एका बीजोत्पादन कंपनीच्या प्रक्षेत्रावर दोन बाय चार मीटर अंतरावर अतिघन लागवड केली. त्यानंतर अशा प्रकारची घन लागवड कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील काही भागात होऊ लागली. याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ पहा..

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Agriculture Mortgage Loan : ‘शेतीमाल तारण’साठी औसा बाजार समितीचे पहिले पाऊल

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला

8th Pay Commission: ५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठवा वेतन आयोग 'या' दिवशी लागू होणार

Rabi Sowing : लातूर विभागात पंधरा लाख हेक्टवर रब्बीचा पेरा

SCROLL FOR NEXT