mango protection tips agrowon
Video

Mango Crop : ढगाळ वातावरण आणि उष्णतेत आंबा पिकाची काय काळजी घ्यावी?

Mango farming tips: कोकण विभागात दिनांक १७ मेपर्यंत पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३३.६ अंश राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा पिकाची काय काळजी घ्यावी? याचीच माहिती आपण जाणून घेऊयात..

Team Agrowon

Mango crop care: तुरळक ठिकाणी असलेली पावसाची शक्यता लक्षात घेता तयार झालेल्या (चौदा आणे - ८० ते ८५ टक्के पक्वतेच्या) आंबा फळांची काढणी देठासह करून घ्यावी. ही काढणी उन्हाची तीव्रता कमी असताना करावी. पावसामुळे आंबा फळावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊन काळे डाग पडतात. काळे डाग वाढत जाऊन फळे पिकताना सडू शकतात. त्यामुळे आंबा काढणीकरीता १५ दिवस शिल्लक असतील, तर अशा ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. दमट वातावरणामुळे काढणी केलेल्या आंबा फळावर फळकुज या रोगाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे काढणीनंतर फळांवर तपकिरी काळ्या रंगाचे चट्टे दिसून फळे कुजतात. फळांचे मोठे नुकसान होते. या फळकुजच्या नियंत्रणासाठी फळे काढणीनंतर लगेचच उष्ण जलप्रक्रिया करावी. त्यासाठी फळे ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेवावीत. अशी फळे खोक्यात भरावीत अथवा पिकण्यासाठी आढीत ठेवावीत. आंबा फळांची काढणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढते. आंबा फळे काढल्यानंतर लगेचच सावलीमध्ये ठेवावीत. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. आंबा वाहतूक भरदिवसा उन्हामध्ये वाहनांच्या टपावरून करणे टाळावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rahul Gandhi: मोदी, शहा हे गद्दार; त्यांनी देश विकला : राहुल गांधी

Heatstroke Cases: उष्माघाताचे राज्यात २१९ रुग्ण

India Growth Rate: भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवर

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३४ टक्के पाणीसाठा

Brazil Ethanol Production: ब्राझीलचा इथेनॉल उत्पादनावर भर

SCROLL FOR NEXT