Tur dal latest price Agrowon
Video

Tur Rate: जाणून घ्या; आजचे डाळिंब, तूर, बाजरी, मोहरी आणि वांग्याचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण डाळिंब, तूर, बाजरी, मोहरी आणि वांगी बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

Brinjal rate: बाजारात मागील काही दिवसांपासून वांगी आवक कमी झाली आहे. मात्र दुसरीकडे वांगीला चांगला उठाव आहे. बाजारात आज वांगी सरासरी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकली गेली. डाळिंबाचे दर तेजीत आहेत. डाळिंबाला आज सरासरी ७ हजार ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील बाजरीची आवक टिकून आहे. त्यामुळे बाजारीचे दरही मागील २ महिन्यांपासून स्थिर दिसत आहेत. बाजारात बाजरी आजही सरासरी प्रतिक्विंटल २ हजार ४०० ते २ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान विकली गेली. मोहरीचे दर मागील काही आठवड्यांपासून काहीसे सुधारले आहेत. मोहरीला सध्या बाजारात ६ हजार ते ६ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तुरीच्या बाजारातील मंदी कायम आहे. वाढत्या आयातीमुळे देशात तुरीची उपलब्धता चांगली आहे. सध्या बाजारात तूर प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ५०० ते ६ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Multi Crop Farming: जोखीम कमी करणारे चार पीक पद्धतीचे तंत्र

Potato Planter Machine: ट्रॅक्टरचलित बटाटा लागवड यंत्र

Vermicompost Briquettes: व्हर्मी कंपोस्ट, डीएपी खताचेही तयार होणार ब्रिकेट

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पाच्या खर्चाची किंमत निश्चित

Farm Loan Waiver Controversy: कृषी कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक

SCROLL FOR NEXT