कापूस उत्पादन आणि वापर समिती अर्थात सीओसीपीसीची बुधवारी (ता.१६) मुंबईत बैठक झाली. वस्त्रोद्योग सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारला काही शिफारशी करण्यात आल्या. सीओसीपीसीचे सदस्यांमध्ये कापूस उद्योगातील सर्व भागीदारांचा समावेश आहे. देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली. कापूस वापरापेक्षा यंदा उत्पादन कमी आहे. उत्पादन कमी राहीले तरी शेतकऱ्यांना कापसासाठी योग्य दर मिळाला नाही. कमी दर मिळाल्याने शेतकरी आडचणीत आले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव कमी असल्याने हा कापूस देशात आयात करावा, यासाठी उद्योग प्रयत्न करत आहेत. आंरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त आहे. देशात कापसाचे भाव जास्त आहेत. त्यामुळे देशातील उद्योगांचा खर्च वाढत आहे. परिणामी सूत आणि कापड निर्यातीमध्ये अडचणी येत आहेत, असे कापड उद्योग म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्वस्त कापूस देशात यावा यासाठी उद्योग प्रयत्न करत आहेत. मागील महिन्यातच उद्योगांनी अमेरिकेच्या १५ ते २० लाख गाठी कापसाची शुल्कमुक्त आय़ात करावी, अशी मागणी केली होती. आता सीओसीपीसीने सरकारला ११ टक्के आय़ात शुल्क काढण्याची मागणी केली. सरकार सरसकट आयात शुल्क काढू शकत नसेल तर सरकारने एक महिन्यासाठी आयात शुल्काला स्थगिती द्यावी, अशीही शिफारस सीओसीपीसीने केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.