Crop Insurance agrowon
Video

Crop Insurance: शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पीकविमा भरपाई

शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ हजार १७५ कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरअंतर्गत ही भरपाई मिळणार आहे. त्यापैकी आतापर्यंत १ हजार ४७३ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. तर उरलेली भरपाई आठवडाभरात खात्यात जमा होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

Team Agrowon

राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरअंतर्गत भरपाई विमा कंपन्यांनी द्यावी, असा नियम आहे. राज्याने दुसरा हप्ता दिल्यानंतर काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई मिळते. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून विमा भरपाई मिळत आहे. 
स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रीगर अंतर्गत शेतकऱ्यांना द्यावयाची भरपाई निश्चित होत आहे. तसेच ही भरपाई खात्यात जमा होण्यालाही सरुवातही झाली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना एकूण ३ हजार १७५ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी २ हजार ४६७ कोटी रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळणार आहेत. तर ७०८ कोटी रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून मिळणार आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT