Kharif Season 2024 Agrowon
Video

Kharif Season 2024: पिकांना रासायनिक खते कशी द्यावीत?

Fertilizer Management: कोणत्याही पिकांच्या उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या सारखी १६ पोषकद्रव्ये आवश्यक आहेत.

Team Agrowon

Chemical Fertilizer Selection: रासायनिक खतांची निवड करताना दीर्घकालीन पिकांसाठी नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५,अमोनियम फॉस्फेट यासारख्या संयुक्त खतांचा वापर करावा.  स्फुरद या अन्नद्रव्याची उपलब्धता सोपी होण्यासाठी पूर्णपणे विरघळणाऱ्या खतांची निवड करावी. यामध्ये सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट यासारख्या खताचा समावेश होतो. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू म्हणजेच पि.एस.बी. खतांचा वापर करावा. डाळवर्गीय आणि तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करावा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट ही गंधकयुक्त खते आहेत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवरणयुक्त युरियाचा म्हणजेच निमकोटेड युरिया किंवा सल्फर कोटेड युरियाचा वापर करावा. हिरवळीची खते म्हणून गिरीपुष्पाचा किंवा सुबाभळीच्या कोवळ्या फांद्या वापराव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT