Maharashtra Government Agrowon
Video

Maharashtra Government: महायुती सरकारवर शेतकरी खुष ?

Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्त राज्य करण्याची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्र्यांची म्हणजेच एकनाथ शिंदेंची ग्वाही अडीच वर्षात हवेत विरून गेली.

Team Agrowon

Soybean: जानेवारी २०२४ ते जून २०२४ च्या दरम्यान राज्यातील १ हजार २६७ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. आता मात्र शिंदेंना शेतकरी आत्महत्य रोखण्यासाठी शेतकऱ्यांचं समुपदेशन महत्वाचं वाटू लागलंय. त्यामुळं त्यावरही सरकार एक टिम नियुक्त करणार असल्याचं सरकारच्या शेवटच्या काळात सुचलंय. म्हणजे शेतकऱ्यांना मानसिक ताणतणावापासून दूर ठेवता येईल, अशी शिंदे यांची धारणा आहे. मागच्या वर्षभरात केंद्र सरकारच्या शेतमालाच्या निर्यात निर्बंध आणि आयातीच्या लोंढ्यावर मुख्यमंत्री चुपी साधून होते. आता मात्र त्यांना निवडणुकीमुळं शेतकऱ्यांची काळजी वाटू लागलीय. अर्थात त्याचं स्वागतच. पण मुख्यमंत्री स्वत:च्या शब्दाचे पक्के नाहीत. मग कांदा अनुदान, दूध अनुदान, सोयाबीन-कापूस अनुदान असो वा शेतकरी आत्महत्यासारखा गंभीर विषय असो मुख्यमंत्री स्वत:ची आश्वासन, ग्वाही स्वत:च पाळत नाहीत, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT