BBF farming technique agrowon
Video

BBF Technology: बीबीएफ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान

विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतांश कोरडवाहू भागांमध्ये खरीप हंगामात सोयाबीन हे आता एक महत्त्वाचे नगदी पीक ठरले आहे. मात्र, पावसावर संपूर्णतः अवलंबून असलेल्या या पिकाच्या उत्पादनावर पावसाच्या अनिश्चिततेचा मोठा परिणाम होतो. यावर मात करण्यासाठी "रुंद वरंबा सरी" (BBF) तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. मग बीबीएफमध्ये सुधारित कोणतं तंत्र आलं आहे? बीबीएफ तंत्राचे फायदे काय? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत...

Team Agrowon

अलीकडच्या वर्षांत हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे – कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. अशा परिस्थितीत BBF तंत्रज्ञान हे जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी उपयुक्त ठरते. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान एक वरदान आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील संशोधकांनी या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एकात्मिक कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (RIFS) अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतांवर प्रात्यक्षिके राबवली असून अनेक यशस्वी उदाहरणे उभी केली आहेत.

बीबीएफ आधारीत सुधारीत तंत्रज्ञान

मध्यम काळ्या जमिनीत राबवावे. एक नांगरट व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमिनीची तयारी करावी. पीडीकेव्ही बायोकॉन्सर्शिया जैविक द्रावण वापरून बियाणे प्रक्रिया करावी. बीबीएफ यंत्राने ४५ से.मी. अंतर असलेल्या पिकांची (मका, ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, कपाशी) पेरणी शक्य. सोयाबीनसाठी ४५ x १० से.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. PDKV-अंबा, PDKV-सुवर्ण, PDKV-यलो गोल्ड यांचा वापर करावा. बियाणे आणि खते योग्य खोलीवर एकत्र पेरता येतात.

बीबीएफ तंत्राचे फायदे 

अतिवृष्टीमध्ये: सऱ्यांमधून अतिरिक्त पाणी वाहते, त्यामुळे पाणी साचत नाही.

दुष्काळी परिस्थितीत: मुळांजवळ ओलावा टिकतो, पीक तग धरते.

उत्पादनवाढ: शेतकऱ्यांना BBF तंत्र वापरल्यास एकरी ३ ते ४ क्विंटल अधिक उत्पादन मिळाल्याचे दिसून आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीची पेरणी ७५ टक्के

VNMKV Research Park: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रिसर्च पार्क प्रस्तावित

Flood Damage Issues: माढ्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या

Farmer Crisis: कापसावर बोंडअळीचे आक्रमण; शेतकरी संकटात

Mulberry Cultivation: सांगली जिल्ह्यात ५९३ एकरांवर तुती लागवड

SCROLL FOR NEXT