18 new agri tools agrowon
Video

Agriculture Mechanization: चार कृषी विद्यापीठांकडून यंत्र आणि अवजारांच्या प्रसारणाला मान्यता

Farm tools for agriculture: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वतीने गुरुवार (ता. २९) ते शनिवार (ता. ३१) या कालावधीत चार कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या संयुक्त संशोधन व विकास समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील विविध कृषी विद्यापीठांनी सादर केलेल्या १४ शेतीपिकांचे वाण, ६ फळपिकांचे वाण, २ भाजीपाला वाण आणि १८ कृषी यंत्रे-अवजारे यासह एकूण २२५ सुधारित तंत्रज्ञान शिफारशींच्या प्रसारणास मान्यता देण्यात आली. यापैकी ५ वाणांची नोंद राष्ट्रीय स्तरावर झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः मंजूर झालेल्या १८ कृषी यंत्रे-अवजारांची माहिती जाणून घेणार आहोत.

Team Agrowon

New agricultural tools: तांत्रिक सत्रात सादर केलेल्या एकूण २२ यंत्रांपैकी १८ यंत्रांनाच प्रसारणासाठी मान्यता मिळाली. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांचे २, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ९, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३ तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ४ यंत्रांचा समावेश आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

१. भाजीपाला टोकण यंत्र

२. सेमी ऑटोमॅटिक पंफिग कम पॉपिंग यंत्र (खारमुरे व फुटाणे तयार करणारे)

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

१. इंजिनवर चालणारे सोयाबीन कापणी यंत्र

२. विजेवर चालणारे जवस पीक मळणी यंत्र

३. बैलचलित शून्य मशागत तंत्रज्ञानावर आधारित भात टोकण यंत्र

४. गवती चहा, सिट्रोनेला यांच्यापासून तेल निर्मितीसाठी बायोमास डिस्टिलेशन यंत्रणा

५. वन्यप्राणी प्रतिबंधक सौर प्रकाश सापळा

६. मनुष्यचलित सौर ऊर्जेवर आधारित गांडूळखत पसरविणे यंत्र

७. फिरते धान्य स्वच्छता व प्रतवारी करणारे यंत्र

८. मिनी बेसन मिल

९. ट्रॅक्टरचलित फिरते सोयाबीन ड्रायर

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

१. ट्रॅक्टरवर चालणारे "फुले स्पेड नांगर" तव्याच्या कुळवासहित

२. ट्रॅक्टरचलित फळबाग तण कापणी यंत्र

३. विजेवर चालणारे भुईमूग शेंगा तोडणी यंत्र

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

१. विजेवर चालणारे हात भात रोपे लावणी यंत्र

२. तिरफळ सोलणी यंत्र

३. पेक्टीन एक्स्ट्रॅक्शन युनिट

४. स्वयंचलित सतत उष्ण हवेच्या झोतावर आधारित विविध धान्यांपासून लाह्या तयार करणारे संयंत्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Food: मत्स्यखाद्यासाठी ब्लॅक सोल्जर माशीच्या अळ्या

Agriculture Technology: यंत्रसामग्रीच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

Orange Farmers: संत्रा बागांचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या

Agriculture Success Story: युवा शेतकऱ्याची बहुविध फळबाग तंत्र पध्दतीची शेती

Farmers Protest: आश्वासन पाळा, अन्यथा मंत्र्यांना अडवू

SCROLL FOR NEXT