Nuksan Bharpai agrowon
Video

Nuksan Bharpai: अतिवृष्टी आणि पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत निधीला मंजुरी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी ५९० कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीला मंजूर दिली आहे.

Team Agrowon

राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांसाठी ५९० कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीला मंजूर दिली आहे. राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२४ मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, कांदा, मुग, उडीद पिकांसह फळबाग पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकरी तातडीने मदतीची मागणी करत होते. यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारने निधी वितरणास १८ मार्च रोजी मंजूरी दिली आहे. अमरावती विभागासाठी ऑगस्ट २०२४ आणि ऑगस्ट ते सप्टेंबर २०२४ च्या विभागीय प्रस्तावानुसार ५२४ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागातील ४ लाख ९ हजार ५५९ बाधित शेतकऱ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे. ऑगस्ट २०२४ च्या प्रस्तावानुसार अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या २ लाख ९८ हजार ६३६ आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT