Animal Care Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे

शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या यंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

टीम ॲग्रोवन

पिरंगुट (ता. मुळशी) ः ‘शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या यंत्रज्ञानाचा (Agriculture University Technology) अवलंब करून उत्पादन वाढवावे, असे आवाहन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील (Dr. Prashantkumar Patil) यांनी केले.

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत पिंपळोली (ता. मुळशी) येथील शेळकेवाडीतील स्वयंभू महादेव मंदिरात आयोजित केलेल्या चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते. माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष बाबाजी शेळके, श्‍यामराव शेळके, गोपाळ शिंदे व शेतकरी उपस्थित होते.

विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय पुणे यांनी चर्चासत्राचे आयोजन केले होते. या वेळी शेतकऱ्यांशी डॉ. पाटील यांनी संवाद साधला. या वेळी शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध विषयांवरील समस्यांच्या सोडवणुकीबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मावळ येथील प्रभारी कृषी अधिकारी डॉ. नरेंद्र काशीद यांनी भात संशोधन व भात पिकाच्या उत्पन्नवाढीबाबत मार्गदर्शन करून एकात्मिक खत व्यवस्थापनाची माहिती दिली.

पुणे येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांनी शेतकऱ्यांच्या भाजीपाला उत्पादनाच्या समस्यांचे निराकरण केले. डॉ. श्रीहरी सबनीस यांनी पिकांच्या एकात्मिक रोग व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. पुणे येथील देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी गोशाळेबाबत मार्गदर्शन केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर यांनी आंब्याला नियमित व लवकर मोहोर येण्याबाबतचा सल्ला दिला.

जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन कृषी पुरस्कार विजेते नवनाथ शेळके म्हणाले, ‘सेंद्रिय शेती उत्पादन घेण्यास शेतकरी तयार आहेत, परंतु शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.’ डॉ. सुनील जोगदंड यांनी पेरू बहार व्यवस्थापनाची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी कुडल हसरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एच. चौधरी, विश्‍वनाथ काळभोर यांनीही मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT