Agriculture Technology
Agriculture Technology Agrowon
टेक्नोवन

कृषी तंत्रज्ञान शेतीच्या बांधावर पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम

टीम ॲग्रोवन

परभणी ः कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान (Agriculture University's Technology) शेतकऱ्यांच्या बांधावर (Farm Bunds) प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी दिल्ली परिसरातील ‘मेरा गाव-मेरा गौरव’ (माय व्हिलेज-माय प्राइड) (My Village My Pride) या उपक्रमाच्या धर्तीवर मराठवाड्यात विशेष मोहीम राबविण्यात येईल.

कोरडवाहू शेती (Dry Land), मूल्यवर्धन (Value Addition), सोयाबीन (Soybean), कपाशी आदी पिकांतील यांत्रिकीकरण (Mechanization) उत्कृष्टतेचे केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) स्थापन केले जाईल. शेतकरी सहभागातून बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जाईल. देशातील पहिल्या २० विद्यापीठांमध्ये (टॉप २०) परभणी कृषी विद्यापीठाचा समावेश करण्याचे उद्दिष्ट आहे. सुमार खासगी महाविद्यालयांना शिक्षणाच्या दर्जा सुधारण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि यांनी दिली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची भविष्यातील दिशा या बाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता. २९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. इंद्र मणि म्हणाले, की शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू ठेवून सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्‍नांची उकल करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. विशिष्ट तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या संशोधन कार्यात सहभागी करून घेऊ. विस्तार शिक्षण विशेष मोहिमेअंतर्गत चार शास्त्रज्ञांचा समावेश असलेला गट दत्तक गावात प्रत्येक महिन्याला भेट देईल. त्यात विद्यार्थ्यांचा समावेश राहील. शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थापनातील शंकाचे निरसन करून सल्ला दिला जाईल. शेतकऱ्यांना प्रगतिशील शेतकरी, फेलो फार्मर यासारखे पुरस्कार दिले जातील. नवनवीन उपक्रमांद्वारे संशोधनातील गुणवत्तेवर भर दिला जाईल. काटेकोर शेती, ड्रोन, रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, हवामानानुकूल शेती यामधील संशोधनाला प्राधान्याने चालना दिली जाईल.

कृषी विभागासह सर्व संलग्न विभागासोबत समन्वयातून काम करू. ड्रोन तंत्रज्ञानाचे मुख्यमंत्र्यासमोर सादरीकरण केले जाईल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये, नवोक्रम, सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी यासाठी इनक्युबेशन सेंटर स्थापन केले जाईल. परदेशात पी.एचडी.साठी प्राध्यापकांना प्रोत्साहन दिले जाईल. सुमार दर्जाची खासगी महाविद्यालये बंद करण्यात येतील. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शकता, विश्‍वासार्हता, वक्तशीरपणा यावर कामकाजात भर दिला जाईल. रिक्त पदांची भरती, विकास निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, प्रशासन यामध्ये नैतिक मूल्यांवर अधिक भर राहील, असे डॉ. इंद्र मणि यांनी सांगितले.

या वेळी शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, नियंत्रक डॉ. दीपारणी देवतराज आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT