Farm Mechanization Agrowon
टेक्नोवन

Farm Mechanization : लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी यंत्र उपयुक्त

Seed, Fertilizer Sowing Machine : सोयाबीन,मका, तूर, ज्वारी यासारख्या खरीपातील मुख्य पिकांची पेरणी १५ जुलै पर्यंत करता येते. या पिकांच्या पेरणीसाठी लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी यंत्र उपयुक्त आहे.

Team Agrowon

Small tractor driven seed, fertilizer sowing machine : ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे अशा ठिकाणी पेरणीला सुरुवात झालेली आहे. सोयाबीन (Soybean),मका, तूर, ज्वारी यासारख्या खरीपातील मुख्य पिकांची पेरणी १५ जुलै पर्यंत करता येते. या पिकांच्या पेरणीसाठी लहान ट्रॅक्टरचलित बियाणे, खते पेरणी यंत्र उपयुक्त आहे. 

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी शक्ती व अवजारे विभागाने हे लहान ट्रॅक्टरवर चालू शकणारे बियाणे व खते पेरणी यंत्र विकसीत केले आहे. या यंत्राने दोन ओळींमधील अंतर हे आवश्यकतेनुसार बदलता येते. तसेच शिफारशीनुसार योग्य खोलीवर दाणेदार खतांची मात्रा देता येते. या यंत्रामध्ये बियाणे घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा दिलेली आहे. हे यंत्र २० ते २५ अश्‍वशक्तीच्या लहान ट्रॅक्टरवर चालते. या यंत्राच्या साह्याने आंतरमशागत सुद्धा करता येते. या यंत्रामुळे बियाणे व वेळेची बचत होते. कार्यक्षमता १.५ ते २.० हेक्टर प्रति दिवस इतकी आहे. हे यंत्र वापरण्यास सोपे असून देखभाल खर्चही खूपच कमी आहे.

यंत्राची रचना कशी आहे?

एका लोखंडी सांगाड्यावर एक पेटी बसवलेली असून, त्याचे खत व बियाण्यासाठी दोन भागात रूपांतर केले आहे. बियाण्यासाठी असलेल्या भागात चार वेगवेगळे कप्पे केले आहेत. बियाण्याची तबकडी पेटीच्या खालच्या बाजूस घट्ट बसवलेली आहे. खतपेटीमध्ये स्वतंत्र कप्पे दिलेले आहेत. खत पेटीत दिलेल्या लोखंडी पट्टीद्वारे खत नियंत्रित केले जाते. 

खतांचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी पेटीवर दिलेल्या लोखंडी पट्टीवर रेषा दिलेल्या आहे. त्यानुसार पट्टीची लांबी कमी-जास्त करून खताची निर्धारित मात्रा देता येते. बीजपेटीतील बियाणे प्रमाण करण्यासाठी खाचा असलेला रोलर बसवलेला आहे. लरच्या पट्टीची लांबी कमी-जास्त करून आवश्यकतेनुसार बियाण्याची मात्रा कमी-जास्त करता येते. 

पेरणी यंत्राला जमिनीवर चालणाऱ्या दातेरी चाकाद्वारे गती दिली आहे. यंत्राची वाहतूक सुलभ होण्यासाठी आणि पेरणीची खोली कमी-जास्त करण्यासाठी यंत्रास दोन चाके दिलेली आहेत. बियाणे, खत पेरणीनंतर आंतरमशागतही शक्य. या यंत्राने हरभरा, मका, ज्वारी, तूर, सोयाबीन इ. पिकांची पेरणी करता येते. 

पिकानुसार दोन फणांतील अंतर कमी-जास्त करता येते. बियाण्यासोबत खताची मात्रा शिफारशीनुसार योग्य खोलीवर व बियाण्याच्या खाली पेरता येते. या यंत्राच्या साह्याने आंतरमशागत सुद्धा करता येते. त्यासाठी पेरणी यंत्राचा मुख्य सांगडा बाजूला काढता येतो. तेथील फणाला जमीन उकरण्यासाठी स्वीप जोडता येते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT