Hi-Tech Agro Tunnel  Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : टनेल्समध्ये फळे, भाजीपाला उत्पादनाचे कॅनडात प्रयोग सुरू

Team Agrowon

Protected Agriculture : संरक्षित शेती म्हटले, की आपल्याला प्रामुख्याने आठवतात ती ग्लासहाउस, पॉलिहाउस किंवा शेडनेट. त्यामध्ये वातावरण नियंत्रणासाठी संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा किंवा नैसर्गिक वायुविजनावर चालणारी यंत्रणा यांचा समावेश असतो. मात्र कित्येक पट उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक नवाच पर्याय पुढे येत आहे, तो म्हणजे ‘हायटेक ॲग्रो टनेल’!

ओन्तारियो (कॅनडा) येथील ‘वेस्टर्न युनिव्हर्सिटी’मधील शास्त्रज्ञ उच्च तंत्रज्ञानयुक्त कृषी टनेल निर्मितीवर काम करत आहेत. या तुलनेने अत्यंत कमी खर्चाच्या संरचनेमध्ये बहुतांश सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी माहिती देताना डॉ. जोशुआ पिअर्स यांनी सांगितले, की आम्ही टनेलमध्ये पिकांचे उत्पादन घेत असताना जास्तीत जास्त सौरऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला आहे. याच ऊर्जेने आवश्यक प्रकाश, पंप, उष्णता पुरविणाऱ्या यंत्रणा चालवल्या जातात. आम्ही प्रति भिंत ७२० पोर्ट लावले आहेत.

दिवसातून दोन वेळा अन्नद्रव्य युक्त पाणी खेचून वर सोडले जाते. तिथून ते पिकांच्या पॉटमध्ये येते. पिकाकडून आवश्यक तितके पाणी घेतल्यानंतर शिल्लक पाण्याचा निचरा पुन्हा एका टाकीमध्ये होतो. पुन्हा पुन्हा याच पाण्याचा पुनर्वापर केला जातो. यात हायड्रोपोनिक्स आणि एअरोपोनिक्स तंत्रज्ञानांचा संगम असून, व्हर्टिकल फार्मिगचा समावेश आहे. प्रत्येक टप्प्यावर प्रकाश पुरविण्यासाठी २४ तास ७ ही दिवस एलईडी दिव्यांचा वापर केला जातो.

दरम्यानच्या कोरोनाच्या काळामध्ये अन्नसुरक्षेच्या समस्येने अकराळ विकराळ स्वरूप धारण केले. प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर आर्थिक पातळीवर शोधू पाहणाऱ्यांना भुकेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जमिनीवर, शेतामध्ये अन्नधान्यांचे उत्पादन किती महत्त्वाचे आहे, हे प्रथमच कळले.

त्याबद्दल किम पार्कर सांगतात, की उत्तर कॅनडातील दुर्गम भागांमध्ये बाहेरून कोठूनही अन्नाचा पुरवठा होत नसल्याच्या या काळामध्ये स्थानिक पातळीवर अन्नांचे उत्पादन घेण्याचे महत्त्व सर्वांना समजले. येथील स्थानिक समुदायांना या वातावरणामध्ये ताज्या व सकस भाज्या व फळांचे उत्पादन घेण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. त्यासाठी अॅग्रो टनेलमध्ये उभ्या पद्धतीच्या शेतीमध्ये पहिल्या टप्प्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचे प्रयोग करण्यात येत आहेत.

या अत्याधुनिक शेतीचा खर्च सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे साध्या ॲग्रो टनेलमध्ये भाज्यांच्या उत्पादन करता येऊ शकते. अर्थात, त्यामध्ये हवामान नियंत्रणाच्या सर्वच बाबी अंतर्भूत करणे सध्या अवघड असले तरी भविष्यामध्ये अत्यंत कमी उंचीच्या या टनेल्समध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती आर्द्रता आणि तापमान नियंत्रित करणे शक्य होईल, असा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.

भारतामध्ये सध्या अनेक रोपवाटिकांमध्ये या छोट्या प्लॅस्टिक टनेल्सचा वापर होऊ लागला आहे. सध्या सातत्याने वाढत चाललेल्या तापमानाच्या आणि हवामानाच्या एकूणच तीव्र स्थितीचा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान नक्कीच फायदेशीर ठरू शकते. सामान्य शेतीपेक्षा या शेती पद्धतीमध्ये खर्चात थोडी वाढ होणार असली तरी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी राखणे शक्य होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT