Agriculture Drone Agrowon
टेक्नोवन

Agriculture Drone : ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीचे प्रात्यक्षिक

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या पिकाच्या किडनियंञणासाठी दोन किंवा तीन कीटकनाशकांच्या फवारण्या शेतकरी करत असतात. परंतु सततच्या पावसामुळे कोणत्याही प्रकारची फवारणी करणे शक्य होत नाही.

टीम ॲग्रोवन

तुळजापूर जि उस्मानाबाद : येथील कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रावर ग्रामीण युवक, शेतकरी आणि शेतकरी महिला यांच्यासाठी शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा (Drone Technology In Agriculture) वापर या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. या पिकाच्या किडनियंञणासाठी दोन किंवा तीन कीटकनाशकांच्या फवारण्या शेतकरी करत असतात. परंतु सततच्या पावसामुळे कोणत्याही प्रकारची फवारणी करणे शक्य होत नाही. वेळेवर फवारणीसाठी मजूर देखील उपलब्ध होत नाहीत.

एका ठरावीक कालावधीनंतर पिकांची पूर्ण वाढ झाल्यामुळे शेतात फवारणीसाठी जाता येत नाही. त्यामुळे कीड पिकांचे नुकसान करते. हे नुकसान टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करता येते. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये विशाल मगर या युवा शेतकऱ्याने शासकीय योजनेचा कोणताही लाभ न घेता स्वत:चे ड्रोन विकत घेतले आहे.

स्वत:च्या बागायती शेतीमध्ये याचा वापर करण्याच्या उद्देशाने ड्रोन घेतले असते तरी यामुळे भाडेतत्वावरील पिकांवर फवारणीचा व्यवसाय श्री विशाल मगर यांना फायदेशीर ठरत आहे. या कार्यशाळेमध्ये कृषी सहायक योगेश स्वामी यांनी ड्रोन खरेदीसाठी शासनाच्या योजना यावर मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT