सूरज शिंदे यांनी तयार केलेले कच्चे रेशीम धागे
सूरज शिंदे यांनी तयार केलेले कच्चे रेशीम धागे  
टेक्नोवन

रेशीम उत्पादकाने सुरू केली कच्चा धागा निर्मिती

विकास जाधव

सातारा जिल्ह्यातील अंतवडी येथील सूरज महेंद्र शिंदे हा युवा शेतकरी तीन वर्षांपासून रेशीम शेतीत कार्यरत आहे. दर्जेदार कोषनिर्मिती करण्यासह कामाचा परीघ व क्षमता वाढवताना प्रक्रिया युनीटद्वारे कच्चा धागा निर्मितीही सुरू केली आहे. त्यास परराज्यातील बाजारपेठ मिळवली आहे. सातारा जिल्ह्यातील अंतवडी, रिसवड (ता. कऱ्हाड) भागात शेतीला पूरक म्हणून मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. अंतवडी भागातच ३५ हून अधिक शेतकरी त्यात गुंतले असावेत. येथील सूरज महेंद्र शिंदे हा तरुण कला शाखेचा पदवीधर शेतकरी. कुटुंबाकडे पाच एकर शेती असून त्यात ऊस तसेच हंगामनिहाय पिके घेतली जातात. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता सूरजने शेती करण्यास सुरवात केली. गावपरिसरात रेशीम शेतीचा बोलबाला असल्याने रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. सन २०१७ मध्ये एक एकरात तुतीची लागवड केली. दोन वर्षे रेशीम शेतीचा अनुभव घेत असताना कोष विक्रीसाठी कर्नाटकातील रामनगर, अथणी येथे जाणे व्हायचे. या परिसरात रेशीमच्या कच्च्या धागा निर्मितीचे रिलिंग युनिट पाहण्यात आले. त्यातील संधी व अर्थकारण सूरज नी अभ्यासले. त्या दृष्टीनेही आपणही केवळ कोषनिर्मितीपुरते न राहाता पुढचे पाऊल टाकावे असे त्यांना वाटले. त्यापूर्वी अनुभव म्हणून वाठार येथील समीर पाटील यांच्या रिलिंग युनिटमध्ये सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यातून आवश्यक तंत्रज्ञान समजून घेतले. रिलिंग युनिट उभारणी रिलिंग युनिट उभारणीसाठी प्रथम पाच लाख रुपयांचे कर्ज सैनिक सहकारी बँकेकडून घेतले. त्यातून बाराशे चौरस फुटाचे शेड व लागणारी यंत्रणा खरेदी केली. व्यवसायासाठी लागणारा सर्व प्रशिक्षित कामगार कर्नाटकातून आणला. सात ते आठ जण कामगार सध्या कार्यरत आहेत. सुरूवातीच्या काळात स्वतःकडील कोषांपासून धागा निर्मिती सुरू केली. त्यानंतर जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून कच्चा माल म्हणजे कोषांची खरेदी सुरू केली. रेशीम शेतीतील तीन वर्षे तर प्रक्रिया व्यवसायाला सहा महिने असा अनुभव तयार झाला आहे. अशी होते धागानिर्मिती

  • शेतकऱ्यांकडून प्रतवारीनुसार कोषांची खरेदी होते. त्यास कमाल ४०० रुपये, किमान ३०० रुपये प्रति किलोप्रमाणे दर दिला जातो.
  • हे कोष तीन दिवसांच्या आत उष्णता देऊन ड्रायरमध्ये ठरावीक काळासाठी सुकविण्यात येतात.
  •  त्यामुळे ते खराब होण्याचा धोका टळतो.
  •  त्यानंतर पाण्याच्या वाफेद्वारे हे कोष शिजवले जातात. ( सुमारे १०० अंश सेल्सिअस तापमान)
  • त्यानंतर हे कोष रिलिंग यंत्रावर आणून बॅाबीनवर भरले जातात.
  • साधारणपणे तीन तासांत ४० बॅाबीन्स भरल्या जातात. दिवसातून तीन वेळा ही प्रक्रिया होते.
  • -त्यानंतर ‘रिरिलिंग’ यंत्रावर धागा वेगळा केला जातो.
  • वेगळ्या केलेल्या धाग्याची १२० ग्रॅमची लडी तयार होते.
  • प्रति सहा किलो कोषांपासून एक किलो धागा निर्मिती होते.
  • दिवसाकाठी १५ ते १८ किलोपर्यंत धागा निर्मिती होते.
  • बाजारपेठ व अर्थकारण सूरज सांगतात की सध्या कच्च्या रेशीम धाग्यांची निर्मिती करतो आहे. हैदराबाद, बंगळूर व येवला येथे पक्का रेशीम धागा तयार करणारे व्यावसायिक आहेत. ५० किलोचे पॅकिंग करून वाहतुकीद्वारे त्यांना पुरवठा होतो. महिन्याला सुमारे ४०० ते ५०० किलो धाग्यांची निर्मिती होते. एक किलो धागानिर्मितीसाठी यंत्रणा,‘कुकर’साठी जळण, वीजबिल असा सर्व मिळून २५०० रुपये खर्च येतो. बाजारपेठेत त्यास वार्षिक २८०० ते २९०० रुपये दर (प्रति किलो) मिळतो. अर्थात दरांत चढउतारही होतात. त्यातून प्रति किलो निर्मितीमागे तीनशे रुपयांपर्यंत नफा मिळू शकतो. स्वतःकडील रेशीम शेतीतील कोषांचे प्रमाण अजून वाढवल्यास नफ्याचे प्रमाण वाढण्यास मदत होते असे सूरज सांगतात. रेशीम उत्पादकांचा फायदा माण, खटाव, फलटण आदी दुष्काळी पट्ट्यातील रेशीम उत्पादक रामनगर (कर्नाटक) येथे रेशीमकोष पाठवतात. सूरज यांच्या व्यवसायामुळे त्यांना स्थानिक बाजारपेठ मिळाली आहे. सध्या सूरज अशा ६० ते ७० शेतकऱ्यांकडून रेशीम कोषांची खरेदी करतात. सूरज यांनीही आपल्या रेशीम शेतीसाठी ५० बाय २० फुटाचे शेड उभारले आहे. वर्षांतून ते सुमारे पाच बॅचेस कोष उत्पादन घेतात. तयार होणारे सर्व कोष धागा निर्मितीसाठी वापरले जातात. सध्या एकेरी किंवा कच्चा धागा निर्मिती असली तरी येत्या काळात डबल किंवा पक्का धागा निर्मितीत उतरण्याचा मानस आहे. कुटुंबातील आई, वडील तसेच बंधू सागर यांची मदत होते. धागा निर्मितीसाठी रेशीम कार्यालयातील आर. डी पाटील यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे.

    संपर्क- सूरज शिंदे- ९६९७००२१५१, ८००७४७६४६९  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT