ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...
ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची... 
टेक्नोवन

ट्रॅक्‍टरची तांत्रिक तपासणी महत्त्वाची...

वैभव सूर्यवंशी

ट्रॅक्‍टरची योग्य निगा राखावी. ट्रॅक्‍टर दुरुस्तीचे काम वेळेवर करावे. ट्रॅक्‍टरने केव्हा आणि किती काम केले याची नोंद ठेवल्यामुळे ट्रॅक्‍टरचा वापर कार्यक्षम पद्धतीने होतो. ट्रॅक्‍टरपासून जास्तीत जास्त मोबदला मिळतो. ट्रॅक्‍टरची योग्य कालावधीनंतर देखभाल केली नाही तर कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. त्याचबरोबरीने व्यवस्थापन खर्चदेखील वाढतो. दैनंदिन तपासणी, ग्रीसिंग आणि ठरावीक काळानंतर दुरुस्ती केल्यास ट्रॅक्‍टरचे आयुष्य वाढते. देखभालीचे व्यवस्थापन ः

अ सर्व्हिस प्रत्येक ५० तासांनंतरचे सर्व्हिसिंग
ब सर्व्हिस प्रत्येक १०० तासांनंतरचे सर्व्हिसिंग
क सर्व्हिस प्रत्येक २०० तासांनंतरचे सर्व्हिसिंग
ड सर्व्हिस प्रत्येक ४०० तासांनंतरचे सर्व्हिसिंग

नवीन ट्रॅक्टर ः १) पाणी, तेल, इंधन तपासावे. २) इंजिन ऑइल फिल्टर बदलावेत. ३) प्रत्येक नट, बोल्ट आवळावेत. स्टिअरिंगचे सुटे भाग, नट, बोल्ट आवळावेत. ४) चाक आणि त्यातील हवेचा दाब तपासावा. ५) सिलेंडर हेडचे बोल्ट आवळून घ्यावेत. व्हॉल्व्ह क्लिअरन्स जुळवून घ्यावा. ६) रेडिएटरमधील पाणी पातळी तपासावी. ७) एअर क्लिनरची जाळी स्वच्छ करावी किंवा गरजेनुसार बदलावी. ८) इंधन गाळणी स्वच्छ करावी. हायड्रॉलिक ऑइल गाळणी स्वच्छ करावी. जुन्या ट्रॅक्टरकरिता ः १) एअर क्लिनरची जाळी स्वच्छ करावी. २) उत्पादक कंपनीने निर्धारित केलेल्या फ्री प्लेसाठी क्लच योग्य पद्धतीने ठेवावा. ३) रेडिएटरमधील पाणी योग्य पातळीपर्यंत भरावे. ४) पाणी वाहून नेणाऱ्या नळीमधील गळती तपासावी. ५) ट्रॅक्टर कार्यरत असताना भरपूर कंपने होतात, त्यामुळे नट-बोल्ट आवळावेत. प्रत्येक २०० तासांच्या कामानंतर ः १) इंजिन ऑइल बदलावे. २) पहिल्या ५० तासांच्या कामानंतर इंजिन ऑइलची बदली करावी. त्यानंतर पुन्हा ५० तासांनंतर इंजिन ऑइलची बदली करावी. त्यानंतर प्रत्येक १०० तासांनंतर इंजिन ऑइलची बदली करावी. ३) ट्रान्समिशन ऑइल बदलावे. हायड्रॉलिक ऑइल फिल्टर स्वच्छ करावेत. प्रत्येक ४०० तासांच्या कामानंतर ः १) दैनंदिन तपासणी करावी. एअर क्‍लिनरची जाळी साधारणपणे ४०० तासांनंतर बदलावी. कामाच्या स्वरूपानुसार जाळी केव्हा बदलावी याचा अंदाज घ्यावा. २) रेडिएटरमधील पाणी बदलावे. ३) व्हॉल्व्ह क्लिअरन्स तपासावा. ४) इंजिन फिल्टर बदलावे. ट्रॅक्‍टर चालविण्यापूर्वी ः १) इंधनाची पातळी तपासावी. जर इंधनाची पातळी निश्चित केलेल्या पातळीपेक्षा कमी असेल तर इंधन भरावे. २) इंजिन ऑइल, ट्रान्समिशन ऑइलची पातळी तपासावी. ३) प्रत्येक महत्त्वाच्या भागाला ग्रीस लावावे. ४) रेडिएटरमधील पाण्याची पातळी तपासावी. ५) बेल्टचा ताण तपासावा. टायरमधील हवा तपासावी. सुगीपश्‍चात ट्रॅक्‍टर देखभाल ः १) ट्रॅक्‍टर स्वच्छ करावा. २) एअर क्‍लीनर स्वच्छ करून त्यामध्ये नव्याने तेल भरावे. ३) ट्रॅक्‍टर गरम होईपर्यंत इंजिन सुरू ठेवावे. ४) सर्व फिल्टर्स स्वच्छ करावेत. ५) गिअर बॉक्‍स (ट्रान्समिशन) तेल पूर्णपणे बाहेर काढावे. निर्मात्यांच्या निर्देशानुसार पुन्हा नवीन तेल भरावे. ६) डिझेल टाकीमधील, फीड पंपामधील व डिझेल लाइनमधील सर्व डिझेल काढावे. ७) गंज प्रतिबंधक तेल प्रत्येक सिलिंडरमध्ये सोडावे. ८) ट्रॅक्‍टर बॅटरी सोडवून व्यवस्थित बाजूला ठेवावी. ९) चाकांना लावलेली वजने काढून चाकातील पाणी काढावे. ट्रॅक्‍टर लाकडी ठोकळ्याच्या साह्याने उचलून ठेवावा. १०) ट्रॅक्‍टरचा क्‍लच वेगळा करावा. ११) ट्रॅक्‍टर पूर्णपणे झाकावा. ------------------------------------ संपर्क ः वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४ (विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद फार्म, जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT