मेथी वाळवण्याचे तंत्र
मेथी वाळवण्याचे तंत्र 
टेक्नोवन

मेथी वाळवण्याचे तंत्र

सचिन शेळके, अनु सिंह

भारतामध्ये मेथी (शा. नाव - ट्रिगोनेला फीनम - ग्रासम) या पालेभाजीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. एकूण उत्पादनापैकी ७७ टक्के राजस्थानमध्ये, १०.१२ टक्के मध्य प्रदेश, १० टक्के महाराष्ट्रामध्ये, ५.७३ टक्के गुुजरात, ३.५२ टक्के हरियाना, १.०७ टक्के पश्चिम बंगालमध्ये उत्पादन होते. हिवाळ्यामध्ये मेथीचे सर्वाधिक उत्पादन दिसून येते. प्रामुख्याने भाजीसाठी मेथीच्या पानांचा वापर होतो, तर मसाल्यामध्ये मेथी दाण्यांचा वापर होतो. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधांमुळे विविध पदार्थांत वापरली जातात. मेथीमध्ये फाॅलिक ॲसिड, थियामीन, नियासिन, जीवनसत्त्व ए, बी, ६ सी ही जीवनसत्त्वे आढळतात. पोषक तत्त्वे - (प्रति १०० ग्रॅम) कॅलरी ५०, चरबी ६ ते ७ ग्रॅम, पोटॅशियम ७८० मिलीग्रॅम, कर्बोदके ५० ग्रॅम, प्रथिने २४ ग्रॅम, जीवनसत्त्व बी ६- २५ ते ३० टक्के, लोह १८० टक्के, मॅग्नेशियम ५० टक्के. एकाच वेळी मेथीचे उत्पादन बाजारात आल्यास त्याची किंमत अत्यंत कमी होते. अशा वेळी मेथीची पाने वाळवून त्याची भुकटी तयार करणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचा वापर घरगुती, हॉटेल, ढाबे, लग्नसमारंभ इ.मध्ये करता येणे शक्य आहे. साधारणपणे १०० ग्रॅम वजनासाठी २० रुपये दर मिळू शकतो. उत्तम पॅकिंगमध्ये कसुरी मेथी या नावाने विक्री करणे शक्य असून, त्याचा वापर पराठा व सूप यासाठी केला जातो. मेथी पानांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ही भाजी लवकर खराब होते. पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी दोन पद्धती आहेत. नैसर्गिक पद्धत (सूर्यप्रकाशात सुकवणे) ः या पद्धतीमध्ये भाजीचा रंग अनियमित होतो. परिणामी, त्याला चांगला दर मिळत नाही. सूर्यप्रकाशात सौरयंत्रामध्ये वाळवण्याची प्रक्रिया : १. प्रथम भाजी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. भाजीच्या देठाजवळील भाग काढून टाकावा. २. गरम पाण्यामध्ये (३० ते ३५ अंश सेल्सिअस) मीठ १ ते २ टक्के, सोडियम कार्बोनेट ०.१ ते ०.२ टक्के, सायट्रिक आम्ल ०.१ टक्के मिसळावे. या गरम पाण्यामध्ये मेथीची भाजी ३० ते ४० सेकंदासाठी बुडवून ठेवावी. ३. त्यानंतर मेथीची भाजी बाहेर काढून एका ट्रेमध्ये समप्रमाणात पसरून घ्यावे. हे ट्रे सौर वाळवण यंत्रामध्ये ठेवावेत. ४. सौरवाळवणी यंत्रामध्ये मेथीची भाजी ४० ते ४५ अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० तास ठेवून सुकवावी. ५. सुकलेली मेथीची पालेभाजी ही पाॅली प्राॅपेलीन प्लॅस्टिक पिशवीत किंवा डब्यामध्ये हवाबंद करून थंड व कोरड्या जागी साठवावी. सचिन शेळके, ८८८८९९२५२२ अनु सिंह, ६३९२६७३९७०. (अन्न अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभाग, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अन्नतंत्र महाविद्यालय, लोदगा, लातूर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT