भुईमुग शेंगा काढणी यंत्र
भुईमुग शेंगा काढणी यंत्र 
टेक्नोवन

संजयभाई टिलवा यांनी तयार केले ट्रॅक्टरचलित भुईमूग काढणी यंत्र

अनामिका डे, अलजुबैर सय्यद

भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून काढणीसाठी मजूर मोठ्या प्रमाणात लागतात. एेन काढणीच्या हंगामात मजुरांची टंचाई असल्याने जादा मजुरी देऊन भुईमूग शेंगांची काढणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन गुजरात राज्यातील जाम्पोदड (ता. वंथली, जि. जुनागढ) येथील प्रयोगशील शेतकरी संजयभाई टिलवा यांनी ट्रॅक्टरचलित भुईमूग शेंगा काढणी यंत्र तयार केले आहे. जाम्पोदड गावात संजयभाई टिलवा यांची शेती आहे. ते स्वतः भुईमूग उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्या गाव शिवारात बहुतांश शेतकरी भुईमूग लागवड करतात. भुईमूग काढणीच्या वेळी मजूर टंचाई लक्षात घेऊन टिलवा यांनी भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून स्वतःच्या संकल्पनेतून सन २००७ मध्ये हातचलित भुईमूग शेंगा काढणी यंत्र विकसित केले. विविध शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या यंत्राची चाचणी घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की हे यंत्र चालवण्यासाठी कौशल्य असलेल्या मजुरांवर अवलंबून राहावे लागते, तसेच यंत्राने अपेक्षित प्रमाणात आणि वेळेत भुईमूग शेंगांची काढणी करता येत नाही. त्यामुळे टिलवा यांनी उपलब्ध साधन सामग्री आणि स्व कल्पनेतून ट्रॅक्टरचलित भुईमूग शेंगा काढणी यंत्र विकसित केले. यंत्र विकसित केल्यानंतर टिलवा यांनी स्वतःच्या शेतीमध्ये या यंत्राचे परीक्षण केले. यामध्ये त्यांच्या लक्षात आले की यंत्राने भुईमुगाची झाडे जमिनीतून काढताना काही वेळा तुटतात, शेंगा तशाच जमिनीत रहातात. या अडचमीवर अधिक संशोधन करून २००९ मध्ये त्यांनी यंत्रामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. या यंत्राचे पुन्हा विविध शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये परीक्षण केले. या यंत्राला भुईमूग उत्पादकांनी पसंती दिली. संजयभाई टिलवा यांना यंत्राच्या निर्मितीसाठी ‘ग्यान` संस्थेने तांत्रिक मदत केलेली आहे. या यंत्राच्या बरोबरीने टिलवा यांनी मळणी यंत्र, ट्रॅक्टर ट्रॉली, कपाशीच्या पऱ्हाटी काढण्याचे अवजार, तव्याचा नांगर तयार केला आहे. सन २०१३ मध्ये नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामध्ये नॅशनल ग्रासरूट इनॉव्हेशन ॲवॉर्ड या पुरस्काराने गौरविण्यात आले.       असे आहे यंत्र ः

  • भुईमूग शेंगा काढणी यंत्र ३५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा अधिक शक्ती असलेल्या ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टला जोडता येते.
  • यंत्राला ‘व्ही` आकाराचे ब्लेड लावलेले आहेत. त्यामुळे भुईमुगाची झाडे शेंगेसह जमिनीवर येतात. शेंगा जमिनीत शिल्लक राहात नाहीत.
  • हे यंत्र कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वापरता येते.
  • जमिनीचा प्रकार आणि लागवडीच्या ओळीनुसार यंत्राला लावलेले ब्लेडचे अंतर बदलता येते.
  • यंत्राला असलेल्या ब्लेडच्या साहाय्याने भुईमुगाचे झाड शेंगासह जमिनीवर येते. त्यानंतर यंत्राला असलेल्या ‘कन्व्हेअर बेल्ट`च्या साहाय्याने शेंडाचे झाड उचलले जाते. कन्व्हेअर बेल्टच्या कंपनांमुळे शेंगांना असलेली माती शेतात पडते. त्यानंतर शेतामध्येच एका ओळीत भुईमुगाची शेंगासह झाडे ठेवत यंत्र पुढे जाते.
  • साधारणपणे जमिनीच्या प्रकारानुसार एका तासामध्ये एक ते दिड एकर क्षेत्रातील भुईमुगाच्या शेंगांची काढणी केली जाते.
  • जुनागडमधील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालामध्ये परिक्षण करण्यात आले आहे.
  • संपर्क ः ०७९-२६७६९६८६ (ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

    Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

    Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

    Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

    Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

    SCROLL FOR NEXT