कोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा वापर केला जातो. या लाकडाला पर्याय म्हणून तांदळाच्या भुश्याचा वापर गॅसिफायरच्या माध्यमातून करणे शक्य आहे. गॅसिफिकेशन प्रक्रियेमध्ये प्राणवायू आणि हवेच्या संयोगाने इंधन म्हणून वापरलेल्या जैविक घटकाचे ज्वलन होऊन गॅसमध्ये रूपांतर होते. आमरस आटवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा चांगल्याप्रकारे उपयोग करता येतो. यामध्ये आपण इंधन म्हणून लाकूड, कचरा, पाला-पाचोळा, तांदळाचा भुस्सा याचा वापर करणे शक्य आहे. कोकणाचा विचार करता उपलब्ध तांदळाच्या भुशाचा वापर गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून करणे शक्य आहे. गॅसिफायरची तांत्रिक रचना ः
गॅसिफायरचा वापर ः
वैशिष्ट्ये ः
नफा : खर्चाचे विश्लेषण ः
तंत्रज्ञान विकास ः गॅसिफायर तंत्रज्ञान विकासासाठी दापोली येथील कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मनीष मानकर यास अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे प्रमुख डॉ. ए. जी. मोहोड, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वाय. पी. खंडेतोड तसेच डॉ. के. जी. धांदे आणि अमित देवगिरीकर यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या गॅसिफायरचे फॅब्रिकेशन विद्यापिठाच्या कार्यशाळेत करण्यात आले आहे. संपर्क ः डॉ. ए. जी. मोहोड ९४२२५४६९०५ मनीष मानकर ः ८६०५८२१९४९
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.