विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारले फवारणी यंत्र !
विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारले फवारणी यंत्र ! 
टेक्नोवन

शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करणारे फवारणी यंत्र !

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : आपल्या कल्पकतेचा वापर करून देवगिरी महाविद्यालयाच्या बी.ई. मॅकेनिकलच्या विद्यार्थ्यांनी कीडनाशक फवारणी यंत्र बनविले आहे. सायकलरूपी असलेले हे यंत्र शेतकऱ्यांचे श्रम, वेळ आणि पैशाची बचत करण्यात परिणामकारक ठरेल असा विश्‍वास या विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केला आहे.  मूळचे चित्तेपिंपळगाव येथील रहिवासी व शेतकरी कुटुंबातील योगेश राजेंद्र गावंडे व निखिल भास्कर गावंडे अशी यंत्र बनविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला असतांना शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे या भावनेतून दोघांनीही चिंतन सुरू केले. या चिंतनातून त्यांना शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या खुरपणी व फवारणीच्या समस्या, त्यावर होणारा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्‍याबाहेरचा असल्याचे निदर्शनास आले. त्यामधून दोघांनीही फवारणी यंत्राचे कायम पाठीवर असणारे ओझे कमी करता येईल का, याचा विचार सुरू केला. त्यामधून सायकलचा सांगाडा, चाक व त्यावर फवारणी यंत्र अशी संकल्पना त्यांच्या मनाला भावली. त्यामधून साकारलेले त्यांचे हे यंत्र वापरताना  पाठीवर घेऊन फवारणी करण्याची गरज नाही.  एकावेळी चार सऱ्या (ओळी) फवारण्याची सोय आहे. सरीनुसार व पिकाच्या उंचीनुसार पाच फुटांपर्यंतच्या अंतरात फवारणी करता येण्याची सोय आहे. दुचाकीच्या तंत्रज्ञानाचा विचार करून हे यंत्र विकसित केले आहे. चाक फिरले की पंप सुरू होण्याची सोय या यंत्रात केली. शिवाय शरीरापासून विशिष्ट अंतर ठेवून असल्याने फवारणीवाटे द्रावण शरीरावर येण्याचा धोका नाही. पुढे लोटत नेऊन वा मागे ओढत फवारणी करण्याची सोय या यंत्रामध्ये केली आहे.  पहा प्रत्यक्ष video...   

भाऊ निखिल गावंडे हा वर्षभर यंत्रावर काम केल्यानंतर नोकरी करण्याच्या मार्गी लागला. परंतु आपण उद्योजक व इतरांच्या सहकार्य व मार्गदर्शनात यंत्राची निर्मिती व विक्रीचे काम सुरूच ठेवले. काही ठिकाणी सादरीकरणात विद्यार्थी मित्रांची मदतही घेतली. यंत्राची विक्री केल्यानंतर त्याचा वापर करणाऱ्या व्यक्‍तींकडून यंत्राविषयीचा ‘फीडबॅक’ घेण्याचेही काम आम्ही करत असल्याचे योगेश गावंडे म्हणाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांसह दिल्लीला यंत्राचा पुरवठा आपण केल्याचे योगेश गावंडे म्हणाले.  प्रदर्शनात आवर्जून पाहा हे फवारणी यंत्र आजपासून औरंगाबाद येथे २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत जबिंदा ग्राउंड येथे ‘ॲग्रोवन’चे भव्य कृषी प्रदर्शन सुरू होत आहे. या प्रदर्शनात हे यंत्र शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केले जाणार आहे. या यंत्राविषयी अधिक माहितीही या वेळी जाणून घेणे शेतकऱ्यांना या निमित्ताने शक्य होणार आहे.    : योगेश गावंडे 7350899801 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT