अलीकडे विविध पिकांच्या काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टरचा वापर वाढत आहे. त्यामुळे वेळेवर आणि वेगाने काढणी करणे शक्य झाले आहे. मात्र या यंत्राद्वारे काढणी केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंढा किंवा भुश्शाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करण्यामध्ये अडचणी येतात. अनेक ठिकाणी पिकाचे हे अवशेष जाळून टाकले जात असल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. या गोष्टी टाळण्यासाठी पिकाचा शिल्लक राहिलेला पेंढा कापणी, आवश्यकता असल्यास त्याचे बारीक तुकडे करणे व गोळा करणे ही तिन्हीही कामे एकत्रितरीत्या करणारे यंत्र उपयोगी ठरते. या यंत्राला स्ट्रॉ कंबाइन या नावाने ओळखले जाते. हे यंत्र ३५ ते ५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवले जाते. अशा प्रकारचे स्वयंचलित स्ट्रॉ कंबाइन यंत्रही उपलब्ध आहे. यंत्राच्या मागे जोडलेल्या ट्रेलरमध्ये भुस्सा गोळा केला जातो. संरचना :
यंत्राची काही वैशिष्ट्ये : एकूण परिमाण (सें.मी.) ः ४६८ × १६० × १९७ ऊर्जेचा स्रोत ः ३५ एचपी किंवा त्याहून अधिकचा ट्रॅक्टर कटर बार रुंदी, (सें.मी.) ः २०० ब्लोअर आकार (सें.मी.) ः ५० × ७० कॉन्केव्ह ओपनिंग (सें.मी.) ः २ कटची उंची (सें.मी.) (पेंढा कापण्याची उंची) ः २ उपयुक्तता १) स्ट्रॉ कंबाइनची कार्यक्षमता ०.४ ते ०.५ हेक्टर प्रति तास एवढी आहे. सुमारे १ ते २ टन भुस्सा प्रति हेक्टरमध्ये मिळू शकतो. २) पारंपरिक पद्धतीने मळणी करण्याच्या तुलनेत हे यंत्र ५५-६५ टक्के पेंढा यशस्वीरीत्या पुन्हा उपलब्ध होऊ शकते. ३) वाया जाण्याची शक्यता असलेले धान्य प्रति हेक्टरी ७५-१०० किलो पुन्हा मिळू शकते. डॉ. अमोल गोरे, ९४०४७६७९१७ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.