यंत्राने काढा जांभळाचा गर
यंत्राने काढा जांभळाचा गर 
टेक्नोवन

यंत्राने काढा जांभळाचा गर

प्रमोद बकाने, अश्विनी गावंडे, मिलिंद डोंगरदिवे

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्रामुळे वेळ, मनुष्यबळ कमी लागते. गराची प्रत सुधारते. प्रक्रिया उद्योगासाठी हा गर फायदेशीर ठरतो. १) जांभूळ हे बहुगुणी झाड आहे. याचे पान, लाकूड, फळ, बियांचा उपयोग होतो. फळाची चव आंबट, तुरट, गोड असते. २) जांभूळ हे पाचक, यकृत उत्तेजक व स्तंभक असते. कावीळ, रक्तदोषविकार या आजारांवर जांभळामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या लोह तत्त्वामुळे लवकर गुण येतो. ३) जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक तर किंचित प्रमाणात जीवनसत्त्व ब असते. ४) जांभळामध्ये प्रथिने खनिजे, तंतुमय पदार्थ असतात. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही असते. ५) जांभळाच्या बियांमध्ये ग्लुकोसाईड जाम्बोलीन हा ग्लुकोजचा प्रकार असतो. यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थांचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेहावर गुणकारी आहे. ६) जांभूळ हे रोगप्रतिकार शक्तीत वाढ करणारे उत्तम फळ आहे. जांभूळ हे पाचक आहे. ते पित्त कमी करणारे असून थकवाही दूर करते. जांभूळ हे रक्त शुद्ध करते. ७) जांभळाच्या सेवनाने कमकुवत दात, हिरड्या घट्ट होतात. जांभळाचे फळ नाशवंत असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी चांगली संधी आहे. जांभळाच्या गरासून जाम, जेली, वाईन, व्हिनेगार हे मूल्यवर्धित पदार्थ बनविता येतात.त्यामुळे गृहउद्योगाला चांगली संधी आहे. जांभूळाची तोडणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि हमाली खर्चामुळे उत्पादकास बऱ्याच वेळा नुकसान होते. बाजारभाव कमी मिळतो. हे लक्षात घेऊन जांभळाचा गर काढून तो वर्षभर प्रक्रियेसाठी वापरता येतो. १) जांभळाचा गर एलडीपी(प्लॅस्टिक) पिशवीमध्ये सीलबंद करून -२० अंश सेल्सिअस तापमानामध्ये डीपफ्रिजमध्ये ठेवावा. एक वर्षापर्यंत गर टिकतो. हा गर गैरहंगाम विक्री करून नफा वाढविणे शक्य आहे. जांभळाचा गर काढणारे यंत्र ः १) जांभळाचा गर काढणे ही मोठी अडचण आहे. हा गर बियापासून हाताने वेगळा करताना मजूर आणि कालावधी जास्त लागतो. खर्च वाढतो. हाताळणीमुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर निष्कासन यंत्र विकसित केले आहे. २) यंत्रामुळे वेळ, मनुष्यबळ कमी लागते. गराची प्रत सुधारते. हंगाम नसतानासुद्धा गर उपलब्ध होतो. या यंत्रातून ताशी ८० किलो जांभळाचा गर काढला जातो. ३) यंत्राद्वारे काढलेल्या गराची प्रत चांगली असल्यामुळे बाजारभावात वाढ मिळते. संपर्क ः प्रमोद बकाने, ९८५०७७०८७० (कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT