तंत्र भस्मीकरणाचे...
तंत्र भस्मीकरणाचे...  
टेक्नोवन

तंत्र भस्मीकरणाचे...

डॉ. वैभवकुमार शिंदे

भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थांचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे. भस्मीकरण ही एक रासायनिक प्रक्रिया अाहे. यात कार्बन, हायड्रोजन आणि टाकाऊ पदार्थातील इतर घटक ज्वलन प्रक्रियेतील ऑक्सिजनमध्ये मिसळून त्यापासून उष्णता निर्माण होते. प्रती टन घन टाकाऊ पदार्थाच्या पूर्ण ज्वलनासाठी सर्व साधारणपणे ५००० किलो हवेची आवश्यकता असते. बऱ्याचदा यापेक्षा जास्त हवेचा पुरवठासुद्धा केला जातो. जास्त हवेचा पुरवठा केल्याने ज्वलनासाठी लागणारे पूर्ण मिश्रण व्हायला मदत होते, तसेच तापमान आणि उत्सर्जके नियंत्रित केले जाऊ शकतात. ज्वलनातून निर्माण होणारे वायू म्हणजे कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनोक्साइड, पाणी, ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे आॅक्साईड असतात. भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थाचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे. भस्मीकरण प्रक्रियेचे उद्देश :

  1. आकारमान कमी करणे
  2. टाकाऊ पदार्थांचे स्थिरीकरण करणे
  3. टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा मिळवणे
  4. टाकाऊ पदार्थांचे स्टरीलायझेशन करणे

भस्मीकरणाचे तंत्रज्ञान ः

  1. मास बर्निंग सिस्टिम
  2.  रेफ्युज डीऱ्हाईड फ्युएल सिस्टिम
  3. मोड्यूलर इन्सीरेशन
  4. फ्लुईडाईज्ड बेड इन्सीनरेशन

भस्मीकरणाचे फायदे :

  1. टाकाऊ पदार्थाचे वजन, आकारमान कमी होते.
  2. टाकाऊपासून ऊर्जानिर्मिती होते.
  3. रोजगार निर्मिती.
  4. टाकाऊ पदार्थांची उचित विल्हेवाट.
  5. लघू उद्योगाची संधी.

भस्मीकरण प्रक्रियेतून मिळणाऱ्या ऊर्जा ः

  1. वीज निर्मिती
  2. वाफ निर्मिती
  3. को-जनरेशन (सहवीज निर्मिती)

भस्मीकरण प्रक्रियेतून निर्माण होणारी वायू उत्सर्जके :

  1. कार्बन डायआॅक्साईड
  2. कार्बन मोनॉक्साइड
  3. सल्फर आॅक्साईड
  4. नायट्रोजन ओक्साईड
  5. हायड्रो क्लोरिक असिड
  6. हायड्रोजन फ्लुओराईड
  7. जड धातू

संपर्क ः डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१. (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलॉजी, औरंगाबाद)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT