Pulverizer and pulper
Pulverizer and pulper 
टेक्नोवन

टोमॅटो प्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे

चंद्रकला सोनवणे

टोमॅटोचा ही नाशवंत फळभाजी असल्यामुळे काढणीनंतर लगेत वापरात आणणे गरजेचे असते. पिकलेल्या फळांचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे त्यावर त्वरीत प्रक्रिया करणे आवश्‍यक असते. टोमॅटोवर प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणांची आणि यंत्राची आवश्‍यकता असते. योग्य उपकरणे आणि यंत्राचा वापर केल्यास प्रक्रिया करणे सुलभ होते. भारतामध्ये टोमॅटोला वर्षभर मागणी असते. बाजारात आवक अचानक वाढल्यास योग्य भाव मिळत नाही. टोमॅटो नाशवंत असल्यामुळे त्याची साठवणूक जास्त काळ करता येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा टोमॅटो फेकून दिले जातात. पिकलेल्या टोमॅटोची साठवण क्षमता कमी असते. संपूर्ण पिकलेली फळे दोन ते तीन दिवसांत वापरात आले नाही तर ती लगेच आंबट आणि खराब होतात. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी टोमॅटोवर योग्यवेळी प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ करणे सोयीचे ठरते. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लोखंडी भांड्याचा वापर करू नये. त्यामुळे पदार्थ काळसर पडून खराब होतात. टोमॅटोपासून भूकटी, सॉस, सूप, रस, केचअप, सॉस असे पदार्थ तयार केले जातात. या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते. योग्य प्रक्रिया केल्यास चांगला आर्थिक फायदा होतो. टोमॅटोवर प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणांची आणि यंत्राची आवश्‍यकता असते. योग्य उपकरणे आणि यंत्राचा वापर केल्यास प्रक्रिया करणे सुलभ होते. प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रे, उपकरणे  पल्वलायझर  टोमॅटोची भुकटी बनविण्यासाठी याचा वापर होतो. हे यंत्र २ एच.पी. क्षमतेचे असून, १४४० फेरे प्रतिमिनिट या वेगाने फिरते. हे उपकरण पूर्ण स्वयंचलित असून, प्रतिबॅच २० ते २२ किलो टोमॅटोवर प्रक्रिया करता येते. याचे सर्व भाग ॲल्युमिनिअम आणि स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असतात. स्टीम जॅकेट केटल  हे उपकरण विशेषतः सॉस, सूप गरम करणे, शिजवणे किंवा मिश्रण एकत्रित करणे यासाठी वापरले जाते. किटलीला दोन थर असतात. त्यातील बाह्य थरांमध्ये पाण्याची वाफ सोडली जाते. वाफेच्या उष्णतेने आतील पदार्थ शिजवला जातो. याचे तापमान साधारणपणे १०० अंश सेल्सिअसपर्यंत राहते. पदार्थ थंड करण्यासाठी याला एक अतिरिक्त जॅकेट जोडलेले असते. त्यामध्ये थंड पाणी सोडून पदार्थाचे तापमान कमी केले जाते. यामध्ये ५० लिटरपासून ३ हजार लिटरपर्यंत क्षमतेचे केटल उपलब्ध आहेत. हे उपकरण अर्ध स्वयंचलित असून, सिंगल फेज विद्युत प्रणाली किंवा गॅसवर चालते. वाळवण यंत्र (ड्रायर)  कोणत्याही अन्नपदार्थांतील पाण्याचे प्रमाण हे तो पदार्थ किती दिवस टिकणार हे ठरवते. जितके जास्त पाणी त्या पदार्थात असेल, तितका तो पदार्थ लवकर खराब होतो. आणि जितके पाणी कमी असेल तितका तो पदार्थ जास्त काळ टिकतो. वाळवण यंत्राद्वारे पाण्याचे प्रमाण कमी करता येते. स्टॅंडर्ड ट्रे ड्रायर  स्टील व ॲल्युमिनिअम पासून बनवलेले हे यंत्र अर्धस्वयंचलित प्रकारचे आहे. त्यातील कमाल तापमान १५० अंश सेल्सिअसपर्यंत ठेवता येते. यामध्ये सिंगल एच.पी. व डबल एच.पी प्रकार असून सिंगल फेजवर चालू शकते. साधारण ५० ते १००० किलो इतक्या क्षमतेमध्ये ही यंत्रे उपलब्ध आहेत. ट्रेचा आकार ४६० बाय ६४० बाय ४५ मिलिमीटर आहे. रिफ्रॅक्टोमीट  पदार्थातील साखरेचे प्रमाण मोजण्यासाठी रिफ्रॅक्टोमीटरचा वापर केला जातो. गोडी मोजण्याचे एकक हे ब्रिक्स आहे. यासाठी सहज हाताळण्या योग्य रेफ्रॅक्टोमीटर बाजारात उपलब्ध आहे. त्याचे वजन २९० ग्रॅम आहे. त्याची लांबी २० सेंमी आहे. ३० ते ६० अंश ब्रिक्सपर्यंत गोडी मोजता येते. पद्धत  प्रथम रिफ्रॅक्टोमीटरची स्क्रीन क्षारविरहित पाण्याने धुवून घ्यावी. स्वच्छ पुसल्यानंतर त्यात नमुना घ्यावा. तो स्क्रीनला हळूच दाबल्यानंतर प्रकाशाच्या दिशेने धरावे. अशा प्रकारे पदार्थांमधील गोडी तपासता येते. फळे धुण्याचे यंत्र  फळांना चिकटून बसलेली धूळ व अन्य प्रदूषक घटक स्वच्छ करण्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. फळे थंड किंवा कोमट पाण्याने धुतली जातात. हे यंत्र स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असते. हे यंत्र ३१० व्होल्टच्या सिंगल फेजवर चालते. त्याची फ्रिक्वेन्सी ५० ते ६० हर्टझ् इतकी आहे. एका तासामध्ये २०० किलो फळे धुता येतात. गर वेगळा करण्याचे यंत्र (पल्पर)  फळातील रस किंवा गर वेगळा करण्यासाठी ज्यूसर किंवा पल्परचा वापर केला जातो. सध्या भारतामध्ये अर्धा एचपी व सिंगल फेजवर चालणारे फ्रूट पल्पर यंत्र बाजारात उपलब्ध आहे. त्याची क्षमता ५० किलो प्रतितास इतकी आहे. रसाची विविध प्रकारची घनता मिळवण्यासाठी ०.२५ ते ८ मि.मी. या आकाराच्या जाळ्या उपलब्ध आहेत. यंत्राचे सर्व भाग स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. हे उपकरण संपूर्ण स्वयंचलित आहे. याचा वापर टोमॅटो, आंबा, सफरचंद व इतर वेगवेगळ्या फळांसाठी प्रामुख्याने होतो. - सोनवणे चंद्रकला, ८४०८९७०९३७ (के.एस.के अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT