VNMKV, Parbhani Agrowon
टेक्नोवन

Agriculture Machinery : परभणी कृषी विद्यापीठाकडून लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे विकसित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ‘पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेअंतर्गत लहान आणि मध्‍यम शेतकऱ्यांना उपयुक्‍त ठरणारी अनेक कृषी अवजारे विकसित करण्‍यात आली आहेत.

Team Agrowon

Agriculture Mechanization परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ‘पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेअंतर्गत लहान आणि मध्‍यम शेतकऱ्यांना उपयुक्‍त ठरणारी अनेक कृषी अवजारे (Agriculture Implements) विकसित करण्‍यात आली आहेत.

शेतकऱ्यांकडून या अवजारांना (Agriculture Machinery) मोठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन ही कृषी अवजारे जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्साठी परभणी कृषी विद्यापीठ आणि दर्यापूर (जि. अमरावती) येथील दुर्गा अॅग्रो वर्क्‍स यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.

या कराराद्वारे विद्यापीठाने विकसित केलेल्या १४ कृषी अवजारे निर्मितीचा अधिकार दुर्गा अॅग्रो वर्क्‍स यांना देण्‍यात आला आहे. सामंजस्‍य करार कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्‍या अध्‍यक्षतेत झाला.

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धीरज कदम, विद्यापीठ नियंत्रक दीपाराणी देवतराज, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, योजनेच्या प्रमुख डॉ. स्मिता सोलंकी, ‘दुर्गा अॅग्रो वर्क्स’चे सूरज चंदेल, विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, जनसंपर्क अधिकारी डॉ. प्रवीण कापसे आदी उपस्थित होते.

डॉ. इंद्र मणी म्‍हणाले, ‘‘परभणी कृषी विद्यापीठाने अनेक कृषी अवजारे संशोधित केली आहेत. त्यांची दर्जेदार निर्मिती करून किफायतशीर दरात शेतकऱ्यांना मिळण्यासाठी हा सामंजस्‍य करार केला. केवळ कृषी अवजारे संशोधित करून उपयोगाचे नसून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजेत.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Entrepreneur: महिलांना व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी; केंद्र सरकारच्या या ७ महत्त्वाच्या योजना जाणून घ्या

Mango Fruit Cover: निर्यातक्षम दर्जेदार आंबा उत्पादनासाठी उपाय 'फ्रुटकव्हर'

Banana Price Drop: युध्दाचा खानदेशातील केळीला फटका; निर्यात ठप्प झाल्याने भावातही घसरण

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेतून तुमचे नाव वगळले ! हप्ता येण्यापूर्वी करा याची तपासणी 

Agriculture Corruption Case: कृषी खरेदी प्रकरणात धनंजय मुंडेंना लोकायुक्तांकडून दिलासा; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली

SCROLL FOR NEXT