एकाच उपकरणाद्वारे मिळू शकेल सिंचनासाठी आवश्यक माहिती
एकाच उपकरणाद्वारे मिळू शकेल सिंचनासाठी आवश्यक माहिती  
टेक्नोवन

एकाच उपकरणाद्वारे मिळू शकेल सिंचनासाठी आवश्यक माहिती

वृत्तसेवा

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सेन्सरमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असून, त्यांची कार्यक्षमता वाढत आहे. इंग्लंड येथील डेल्टा टी डिव्हायसेस यांनी ‘वेट सेन्सर’ तयार केले आहेत. हे सेन्सर मातीतील आर्द्रतेचे प्रमाण, पाण्याची विद्युत वाहकता आणि तापमानाची नोंद घेऊ शकतात. या तीन निकषाद्वारेच शेतीतील सिंचन प्रक्रिया अत्यंत सोपी होणार आहे.

सध्या काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी मातीतील पाण्याचे प्रमाण, तापमान आणि विद्युत वाहकता तपासण्यासाठी तीन वेगवेगळ्या उपकरणांचा वापर केला जातो. अलीकडे डिजिटल उपकरणे उपलब्ध असली तरी तीन उपकरणे हाताळावी लागतात. त्यावर मात करण्यासाठी इंग्लंड येथील डेल्टा टी डिव्हायसेस या कंपनीने एकाच उपकरणामध्ये तीनही सेन्सर बसवले आहे. त्याविषयी माहिती देताना कंपनीचे प्रवक्ते टोनी पेलॉय म्हणाले की, सिंचनाचा निर्णय घेण्यासाठी मातीतील पाण्याचे प्रमाण आणि त्याचा दर्जा अत्यंत महत्त्वाचा असतो. या विषयी अधिक काटेकोर माहिती उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना निर्णय घेणे सोपे होते. वास्तविक शेतीमध्ये प्रतिदिन अशा उपकरणाची आवश्यकता असली तरी वेळखाऊ आणि सदोष उपलब्ध तंत्रामुळे वापर फारसा होत नाही. त्यासाठी कंपनीने प्रत्यक्ष रिडींग दिसणाऱ्या व साठवता येणाऱ्या उपकरणाची निर्मिती केली आहे. ते सहज हाताळणीयोग्य असून, त्यातील माहिती नंतर संगणकामध्ये भरता येते. हे उपकरण कसे काम करते, ते पहा....

  • वेट सेन्सरमध्ये धारदार, स्टेनलेस स्टिलचा रॉड असून, तो मातीमध्ये मुळांच्या कक्षेमध्ये खुपसता येतो. त्याद्वारे मातीतील तापमान, पाण्याची विद्युत वाहकता अत्यंत अचूकतेने मोजता येते.
  • एकाच उपकरणाद्वारे विविध तीन प्रकारची माहिती उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांनी तीन वेगळी उपकरणे घ्यावी लागत नाहीत.
  • वेट सेन्सर हे मातीसह कॉयर, पीट, मिनरल वूल यामध्येही वापरता येते. या माध्यमानुसार त्यात पाच प्रकारचे कॅलिब्रेशन करता येतात.
  • पिकाच्या हंगामामध्ये प्रति दिन शेकडो नोंदी घेणे व साठवून ठेवणे शक्य असल्याने वेट सेन्सर हे उत्तम व्यवस्थापन साधन ठरते. अचूक नोंदींमुळे पिकाचा दर्जा आणि उत्पादनामध्ये वाढ शक्य होत असल्याचे टोनी पेलॉय यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

    Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

    Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

    Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

    Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

    SCROLL FOR NEXT