Warkari agrowon
शासन निर्णय

Insurance For Warkaris Scheme : वारकऱ्यांसाठी ५ लाखांचा विमा ; विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी

Ashadhi Ekadashi : आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारने ५ लाखांचे विमा संरक्षण देय्याचा निर्णय घेतला आहे. या विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजनेतून वारकऱ्यांना अपघात, आजारपण आल्यास मदत मिळणार आहे.

Team Agrowon

Insurance Cover : राज्यभरात विविध संतांच्या पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने चालत आहे. तसेच आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने या वारकऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये भरणारी यात्रा २२ जून ते ६ जुलै या कालावधीत होणार आहे. या वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा आणि इतर संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी वारीसाठी मोठ्या संख्येने वारकरी येतात. त्यांच्या सरकार विविध सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकारने पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजनेची घोषणा केली. ही योजना मदत व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे

या योजनेतून वारीमध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तसेच वारकऱ्यास दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये मदत देण्यात येतील. त्याचबरोबर अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील. तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT