Ujwala Yojana
Ujwala Yojana Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Ujwala Yojana : ‘उज्‍ज्वला’ योजनेकडे महिलांची पाठ

Team Agrowon

नेरळ ः केंद्र सरकारने (Central Government Scheme) २०१६ मध्ये ‘स्वच्छ इंधन, बेहतर जीवन’चा नारा देत उज्‍ज्वला योजना (Ujwala Yojana) धूमधडाक्यात सुरू केली होती.

ग्रामीण भागातील (Rural Area) महिला चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे लाकूडतोड तर नष्‍ट होतेच पण धुरामुळे डोळ्यातून पाणी येणे, श्वसनाचे विकार जडतात.

यासाठी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी उज्‍ज्वला योजनेतून मोफत गॅस कनेक्शन (Free gas connection Scheme) योजना सुरू करण्यात आली, मात्र हजारांची मजल गाठणारे गॅस सिलिंडर ग्रामीण भागातील महिलांना (Rural Area Women) परवडेनासे झाले आहे. आर्थिक चक्र बिघडल्याने महिला पुन्हा लाकूड फाट्यांकडे वळल्या आहेत.

ग्रामीण-निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावांत चुलींचा वापर केला जातो. मात्र जळणाऱ्या लाकूड फाट्यामुळे गामीण महिला प्रदूषणाचा बळी ठरत आहेत.

यावर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी २०१६ मध्ये ‘उज्ज्वला योजने’चा शुभारंभ केला. योजनेचा मूळ उद्देश दारिद्र्य रेषेखालील सुमारे पाच कोटी महिलांना मोफत घरगुती एलपीजी गॅस जोडण्या देण्याचा होता.

चुलीतील धुरामुळे महिलांना श्‍वसनाचा त्रास होतो आणि त्यामुळे त्या विविध आजारांना बळी पडतात. स्वयंपाक करत असताना घरात पसरणाऱ्या धुरामुळे लहान बालकेही बाधित होऊ लागली आहेत.

मात्र दोन वर्षांपूर्वी कोरोनाचा उद्रेक झाला, तसा गॅसचाही भडका उडाला. वारंवार भाववाढ झाल्यामुळे दोन वर्षांपूर्वी ६०० रुपयांवर असलेला गॅस सिलिंडर आज चक्क १,०५० रुपयांवर जाऊन पोहचला आहे.

गॅस जोडणी विनाशुल्‍क होत असली तरी सिलिंडर घेण्यासाठी पैसे नसल्‍याने ग्रामीण भागातील अनेक महिलांनी पुन्हा लाकूड फाट्याकडे मोर्चा वळवला आहे.

जंगलातील वाळलेली लाकडे, गवत, चिपाड आदी सकाळी लवकर उठून गोळा करताना तसेच घराच्या अंगणातून गायब झालेल्या चुलीही नव्याने उभ्या राहिलेल्‍या दिसतात.

जिल्ह्यात ६५ हजार गॅसजोडण्या

उज्ज्वला गॅस कनेक्शन देण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल होता. कमीत कमी कागदपत्रात मोफत शेगडी आणि गॅस सिलिंडर मिळत असल्याने पहिल्या दोनच वर्षांत गॅस कनेक्शनसाठी प्रचंड मागणी वाढली होती.

जिल्ह्यात सध्या गॅस सिलिंडर पुरवणाऱ्या तीन शासकीय कंपन्या आहेत. एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल त्यामध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत नोव्हेंबर २०२२ पर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात ६५ हजार २८ गॅस जोडणी देण्यात आल्‍या आहेत.

गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे भाकऱ्या, आंघोळीचे पाणी गरम करणे हे चुकीवर केले जाते. सिलिंडरच्या किमती अवाच्या सवा वाढल्‍या आहेत. त्‍यामुळे पुन्हा चुलीचा नियमित वापर सुरू केला आहे.
समीक्षा पाटील, गृहिणी
सुरवातीपासून चुलीवर जेवण बनवायचो. पण सरकारची योजना आली आणि आम्ही गॅस सिलिंडर घेतले. सुरवातीला सबसिडी यायची. पैसे पण कमी होते. पण आता आम्‍हाला वस्तीवर रोज कमावून १००० रुपयांचा सिलिंडर विकत घ्यायला परवडत नाही. म्हणून परत सकाळी उठून लाकडी फाटा गोळा करून आणतो. त्यावर जेवण शिजवतो. आंघोळीचे पाणी सुद्धा गरम करतो.
बेबी पारधी, आदिवासी गृहिणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

Fodder Shortage : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.८७ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

PM Narendra Modi : 'मागील ६० वर्षांच्या काळात एससी/एसटी/ओबीसींची सर्वात वाईट अवस्था'; मोदी यांची काँग्रेसवर टीका 

Maharashtra Rain : उद्यापासून पावसाची स्थिती काय राहील? राज्यातील बहुतांशी ठिकाणी ऊन आणि पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT