Department Of Agriculture Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Department Scheme : पंढरपुरातील दोन हजार शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ

पंढरपूर तालुक्यात कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून एक हजार ८९६ शेतकऱ्यांना सहा कोटी ४६ लाख १२ हजार ३०४ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News : पंढरपूर तालुक्यात कृषी विभागाच्या (Agriculture Department) विविध योजनांच्या माध्यमातून एक हजार ८९६ शेतकऱ्यांना सहा कोटी ४६ लाख १२ हजार ३०४ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी दिली.

सरडे म्हणाले, की शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींच्या खरेदीसाठी तसेच शेतामध्ये विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच या योजना पारदर्शक व गतिमान पद्धतीने राबविण्यासाठी महाडीबीटी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्र शिकण्यापासून ते अनुदानावर शेतीसाठी आवश्यक उपकरणे खरेदी करता येत आहेत.

कृषी विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने बियाणे, यंत्र व अवजारे, ठिबक तुषार संच इत्यादींची खरेदी तसेच शेततळे, खोदकाम, प्लॅस्टिक अस्तरीकरण, कांदा चाळ, शेडनेट गृह व हरितगृह उभारणी, फळबाग लागवड नियोजन, कृषी यांत्रिकीकरण आदी योजनांचा समावेश असल्याचे सरडे यांनी सांगितले.

पंढरपूर तालुक्यात कृषी विभागामार्फत २०२२-२३ या आर्थिक वर्षात कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ अशा विविध योजनांतून एक हजार ८९६ शेतकऱ्यांना ६ कोटी ४६ लाख १२ हजार ३०४ रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सरडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025 : कापूस, सोयाबीन, तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ; मक्याला मात्र पसंती

Poultry Farming Success : कष्ट करण्याची जिद्द हवी, नोकरीपेक्षा शेतीच बरी

Tomato Crop Disease: टोमॅटो पिकातील खोडकुज रोगाचे व्यवस्थापन

Animal Care: गाई, म्हशीतील वंध्यत्वाची कारणे अन्‌ उपाययोजना

Rural Education: खोट्या नाट्या अकलेचे तारे

SCROLL FOR NEXT