Galmukt Dharan Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Galmukt Dharan Scheme : ‘गाळमुक्त’मधून ५८७ एकर क्षेत्रावर पसरला गाळ

Agriculture Scheme : अकोला जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५८७ एकर क्षेत्रावर धरणांमधून काढण्यात आलेला गाळ पसरविण्यात आला आहे. त्यामुळे १८ कोटी ८० लाख लिटर्सने प्रकल्पांच्या पाणी साठवण क्षमतेतही वाढ झाली आहे.

‘‘या योजनेला मिळालेला प्रतिसाद व लांबलेला पाऊस पाहता शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी पहिला मोठा पाऊस येईपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे’’, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते यांनी दिली.

‘‘या आधी या योजनेअंतर्गत मुदत १५ जूनपर्यंत होती. ती आता वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत गाळ वाहून न्यावा. आपली शेती अधिक सुपीक करून घ्यावी,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ ही जमिनीची सुपीकता वाढविणारी योजना आहे. त्यासाठी अशासकीय संस्थांतर्फे १६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील ५२२ शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन शेतात धरणातील गाळ पसरवून घेतला.

तब्बल ५८७ एकर क्षेत्रावर १ लाख ८८ हजार ४२ घनमीटर गाळ टाकण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात जलसाठवण क्षमतेत १८ कोटी ८० लाख लिटर्सने वाढ झाली आहे. हे अभियान राबविण्यासाठी विविध यंत्रणा सहभागी झालेल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT