Incentive Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Scheme : प्रोत्साहन अनुदानाची दुसरी यादी प्रसिद्ध

गेली अनेक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी (ता. २४) प्रसिद्ध केली. या यादीत जिल्ह्यातील ५७ हजार ३१० शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर किमान १७१ कोटी रुपये जमा होणार आहेत.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर ः गेली अनेक दिवस प्रतीक्षा लागून राहिलेल्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी (Farmer Incentive Scheme) पात्र असलेल्या शेतकऱ्यांची दुसरी यादी शनिवारी (ता. २४) प्रसिद्ध केली. या यादीत जिल्ह्यातील ५७ हजार ३१० शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यांच्या खात्यावर किमान १७१ कोटी रुपये जमा होणार आहेत.

राज्य शासनाने यापूर्वीच थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. या योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीही लाभ दिला नव्हता. यावरून राज्यातील शेतकरी संघटनांसह त्यावेळी सत्तेत नसलेल्या विरोधकांकडून या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सरकारने जास्तीत जास्त ५० हजार अनुदान देण्याची घोषणा केली होती.

शासनाने केलेल्या घोषणेनंतर जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडून सहकार विभागाने यादी मागवली. या यादीनुसार पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठवण्यात आली होती. शासनाने तीन महिन्यांपूर्वी पहिली यादी प्रसिद्ध केली, त्यात जिल्ह्यातील जिल्हा बँकेकडील १ लाख २३ हजार ७६२ तर राष्ट्रीयीकृत बँकेकडील ५ हजार ५५६ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती.

शासनाने दुसरी यादी प्रसिद्ध केली, त्यात जिल्हा बँकेकडील ५४ हजार ४६१ तर राष्ट्रीयीकृत बँकेकडील २ हजार ८४९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा जास्त कर्जाची परतफेड असेल तरीही ५० हजार रुपयेच या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तर ज्यांनी ५० हजारपेक्षा कमी कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांनी परतफेड केलेल्या कर्जाएवढी रक्कम मिळणार आहे.

यादीत नाव प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अंगठ्याचे ठसे घेतले जाणार आहेत. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर लगेच संबंधितांनी दिलेल्या बँकेच्या खात्यावर त्यांच्या अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT